ETV Bharat / bharat

महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ - महंत नरेंद्र गिरी मृत्यू

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Sep 21, 2021, 3:28 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराजमधील बाघम्बरी मठात पोहोचले आहेत. योगींनी महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. योगी यांनी महंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महंत नरेंद्र यांच्या मृत्यून अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, की महंताच्या मृत्यूने सर्वजण व्यथित आहेत. संत समाजाकडून मी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने महंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कुंभ 2019 यात्रा यशस्वी करण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांना महत्त्वाचे योगदान दिले होते. नरेंद्र गिरी यांनी सर्वप्रकारे मदत केली होती. महंत नरेंद्र गिरी यांच्या जाण्यामुळे अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. कुंभ ही जगातील अद्धभुत घटना मानली जाते. अशावेळी साधुंच्या समस्या, धर्माचार्य यांच्या समस्या, आखाडा परिषदेमधील मंदिराच्या समस्या याबाबतच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्यांचे सहकार्य मिळाले.

महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान

संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरीला हरिद्वारमधून अटक

आरोपींना कठोर शिक्षा होणार-

चार अधिकारी प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा मिळेल. उद्या महंत यांचा शवविच्छेदनाचा अहवाल मिळेल. योगी यांनी पोलीस आयुक्त, एडीजी, आयजी, डीआयजी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मठ बाघम्बरी गादीच्या सनातन परंपरेनुसार महंत नरेंद्र गिरी यांना समाधी दिली जाणार आहे.

संबंधित बातमी वाचा-आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, शिष्यासोबतचा वाद आणि इतिहास; वाचा सविस्तर

चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार-

महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलेल्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरीसह इतर शिष्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंताच्या मृत्यूप्रकरणावर जार्ज टाउन पोलीस तपास करत आहे. महंताच्या मृत्यूप्रकरणात अद्याप कोणालाही अटक केली नाही. मात्र, ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले. चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर संतांमध्ये मोठी नाराजी झाली आहे.

संबंधित बातमी वाचा-धक्कादायक : महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला; सुसाईड नोट सापडली

मागील आठवड्यातसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. त्याचसोबत सहा ते सात पानांची सुसाईड नोट सुद्धा हाती लागली आहे. माहितीनुसार या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि एकाला जबाबदार धरले आहे. तसेच मागील आठवड्यात सुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याचीदेखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.