ETV Bharat / bharat

CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सटकली, म्हणाले, माफिया को ‍मिट्टी में देंगे... - CM YOGI IN UP ASSEMBLY ON UMESH PAL MURDER CASE

आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचे पडसाद शनिवारी उत्तर प्रदेश विधानसभेत उमटले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सोडणार नसल्याची घोषणा केली.

CM YOGI ON UMESH PAL MURDER
CM YOGI ON UMESH PAL MURDER
author img

By

Published : Feb 25, 2023, 8:51 PM IST

लखनऊ : प्रयागराज येथील आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची शुक्रवारी भरदिवसा हत्या करण्यात आली. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे राजकारण पुन्हा एकदा तापले. उमेश पाल यांच्या हत्येचे पडसाद शनिवारी यूपी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. माफिया अतिक अहमदचे नाव उघडपणे समोर आले. समाजवादी पक्षाने याला कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश म्हटले आहे, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या माफियांचा नायनाट करणार असल्याची घोषणा केली.

सपाने गुन्हेगारीला खतपाणी घातले : प्रयागराज येथील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल तसेच त्याचा सुरक्षा रक्षक संदीप निषाद यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोळ्या झाडल्याप्रकरणी विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षनेते अखिलेश यांदव यांच्यावर जोरदार टीका केली. गुन्हेगारांची संख्या कशामुळे वाढली? गुन्हेगार, माफियाचा पोसिंदा कोण? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल आहे त्याला सपाने खासदार केले, हे तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही गुन्हेगाराला खतपाणी घातले आहे. मात्र, आमचे सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, त्यांना आम्ही मातीत मिळल्याशिवाय शांत बसणार नाही अशी ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी दिली.

संपूर्ण घटनेला सरकार जबाबदार : शनिवारी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांच्या भाषणापूर्वी आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचे पडसाद सभागृहात उमटले. माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी उमेशच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारला कटघऱ्यात उभे केले. ते म्हणाले की, प्रयागराजमध्ये ज्याप्रकारे घटना घडली त्यावरून हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवसा ढवळ्या शहरात हत्या : तत्पूर्वी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सभागृहात योगी सरकारला चांगलेच धारेवर धरले. उत्तर प्रदेशमध्ये गोळीबार, बॉम्बस्फोट सारखे प्रकार घडत आहे. दिवसा ढवळ्या शहरात हत्या होत आहेत. हेच भाजपचे रामराज्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. योगी सरकार तसेच पोलीस प्रशासन कायदा, सुव्यावस्था राखण्यात स्पशेल अपयशी ठरल्याचा हल्लाबोल त्यांनी योगी सरकारवर केला. या संपूर्ण घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राजू पाल यांची 2005 ला हत्या : राजू पाल हे बहुजन समाज पक्षाचे आमदार होते. त्यांची 2005 मध्ये हत्या झाली होती. उमेश पाल हा त्या हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होता. राजू पालच्या हत्येतील मुख्य आरोपी माफिया अतिक अहमद हा गुजरातमधील तुरुंगात बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिचीही चौकशी केली आहे. अतिकच्या दोन मुलांसह इतरांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. यासोबतच अतिक अहमद टोळीतील अनेक शूटर्सवर पोलिसांची नजर आहे. या घटनेत पूर्वांचलच्या शूटर्सचा हात असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या एका शूटरचा लूक स्थानिक शूटरशी जुळत असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Bomb Blast Threat In Mumbai: जे.जे. रुग्णालय, भेंडीबाजार आणि नळबाजार परिसरात बॉम्बस्फोट करणार; हॉक्स कॉलरला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.