ETV Bharat / bharat

Longest Cruise Service: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीच्या दौऱ्यावर.. देशातील सर्वात लांब क्रूज सेवा करणार सुरु, टेंट सिटीचाही शुभारंभ - देशातील सर्वात लांब क्रूज सेवा करणार सुरु

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीमध्ये देशातील सर्वात लांब क्रूझ सेवा आणि टेंट सिटीचे Varanasi Tent City उद्घाटन करणार आहेत. त्यासाठी ते वाराणसीत दाखल होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊन क्रूझ सेवेचा शुभारंभ करतील.

CM YOGI ADITYANATH VISIT VARANASI TODAY LAUNCH CRUISE SERVICE AND TENT CITY
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीच्या दौऱ्यावर
author img

By

Published : Jan 12, 2023, 4:33 PM IST

वाराणसी (उत्तरप्रदेश): मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी वाराणसीला पोहोचत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, दोन दिवसांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देशातील सर्वात लांब क्रूझ सेवेचा शुभारंभ करणार आहेत. याशिवाय गंगेच्या पलीकडे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीत सुरू असलेल्या विकासकामांबाबत गंभीरतेने घेतले आहे. रविवारीच मुख्यमंत्र्यांनी वाराणसीत येऊन तयारीचा आढावा घेतला.

पंतप्रधान करणार विकासकामांची पायाभरणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गंगा विलास क्रूझला आभासी पद्धतीने उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. यासोबतच विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाराणसीत येत आहेत. दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री बाबपूर विमानतळावर पोहोचतील. तेथून सर्किट हाऊसला ते जाणार आहेत. यानंतर भगवान अवधूत पडाव येथील राम आश्रमात ते जातील.

काशी विश्वनाथ मंदिरात घेणार दर्शन: खोजवा येथे श्रीमद्जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या ७२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित श्री भक्तमाळ कथेतही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. येथील स्वामी डॉ.राम कमलदास वेदांती यांची भेट घेतल्यानंतर ते काशी विश्वनाथ मंदिरात जातील. दर्शन-पूजनानंतर मुख्यमंत्री सर्किट हाऊसमध्ये रात्रीची विश्रांती घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी रविदास घाटावर एमव्ही गंगा विलासला झेंडा दाखवून टेंट सिटीच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील.

टेंट सिटीचे बुकिंग झाले पूर्ण: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी बनारस ते दिब्रुगड या देशातील सर्वात लांब (3200 किमी) क्रूझला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान व्हर्च्युअल पद्धतीने क्रूझ सेवेचा शुभारंभ करतील. 15 जानेवारीपासून टेंट सिटी सर्वसामान्यांसाठी खुली होणार असून, त्यासाठीचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री डॉ. सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मंत्रीही गुरुवारी संध्याकाळपर्यंत वाराणसीला पोहोचतील. श्री काशी विश्वनाथ धाम येथे शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी गुरुवारी सायंकाळी पार्श्वगायक शंकर महादेवन यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.

५०हुन अधिक ठिकाणी होणार प्रवास: उत्तर प्रदेशात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. क्रूझ गंगा विलास भारतातील पहिले नदीपात्रात प्रवास करणारे जहाज आहे. जे काशी ते बोगीबील (डिब्रुगढ) सर्वात लांब क्रूझ प्रवास करणार आहे. हा प्रवास 50 दिवसांत एकूण 3200 किलोमीटरचा असेल. जागतिक वारशाशी संबंधित 50 हून अधिक ठिकाणी हा प्रवास थांबणार आहे. हे जहाज पाणी, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमधूनही जाईल. या सहलीत सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा नॅशनल पार्कचाही समावेश होतो.

हेही वाचा : जगातील सर्वात लांब प्रवासावर निघाले जहाज रामनगर बंदरात पोहोचले गंगा विलास क्रूज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.