ETV Bharat / bharat

मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो.. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, ही भेट खासगी होती व यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. ठाकरे म्हणाले की, त्यांचे पंतप्रधान मोदींबरोबर चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, भले ही आम्ही सध्या एकत्र नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, आमच्यातील चांगले संबंध संपुष्टात आले आहेत.

cm-uddhav-thackeray-meets
cm-uddhav-thackeray-meets
author img

By

Published : Jun 8, 2021, 4:00 PM IST

Updated : Jun 8, 2021, 7:49 PM IST

नवी दिल्‍ली - मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दिल्‍लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानासह महाराष्‍ट्रातील अन्‍य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह उप-मुख्‍यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदि उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, ही भेट खासगी होती व यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. ठाकरे म्हणाले की, त्यांचे पंतप्रधान मोदींबरोबर चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, भले ही आम्ही सध्या एकत्र नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, आमच्यातील चांगले संबंध संपुष्टात आले आहेत. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. जर मी पंतप्रधानांना खासगी विषय घेऊन भेटत असेल तर यामध्ये काही चुकीचे नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे म्हणाले, की एका वर्षानंतर दिल्लीत आलो. सर्वांनाच या भेटीचे कारणही माहित आहे. व्यवस्थित चर्चा झाली. सर्व विषय गांभीर्याने त्यांनी एकून घेतली. या विषयात ते लक्ष घालणार, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे मांडलेले विषय ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील असा विश्वास आहे.

राज्यातील संवेदनशील विषय मराठा आरक्षण आहे. ओबीसी राजकीय आरक्षण, भरतीमधील आरक्षण, तसेच मेट्रोसाठी कारशेड, जीएसटीचा मुद्दा, पीकविमा मधील शर्ती याविषयांवर चर्चा झाली.

गेले काही वर्ष किनारपट्टीच्या भागाला चक्रीवादळाचा सामना करावा लागतो. अशावेळी मदतीचे निकष जुने झाले आहेत. ते बदलावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. 14 व्या वित्त आयोगातील थकित निधी, मराठी भाषा दिनाला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी लवकरात लवकर सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Last Updated : Jun 8, 2021, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.