ETV Bharat / bharat

महिला फाटक्या जीन्स घालतात, मुलांना काय संस्कार देणार, भाजपाच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

author img

By

Published : Mar 17, 2021, 6:52 PM IST

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत

नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, विधान त्यांनी केले. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

भाजपाच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

आजकाल तरुण पिढी चुकीच्या दिशेने जात आहे. आमच्या काळात शिक्षकांची वेगळी ओळख होती. पण आजची तरुण पिढी अगदी वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी तीरथ सिंह यांनी विमानप्रवासदरम्यानाचा प्रसंग सांगितला. यावेळी संस्कावर बोलताना त्यांची जीभ चांगलीच घसरली.

फाटक्या जीन्स घालणाऱया महिला काय संस्कार देणार -

राजस्थानमधून दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. तीच्याजवळ दोन मुले होती. ती महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते. तर तीचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत. त्या महिलेन गमबूट घातले होते. तर गुडघ्यावरची जीन्स फाटली होती. अशा महिला आपल्या मुलांना संस्कार देतील, असे विधान त्यांनी केले.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं -

मुले-मुली फाटलेली जीन्स घालतात. या प्रकारचे वातावरण योग्य नाही. हे ब्रिटिशांचे अनुसरन करत आहेत. आपल्या मुलांना चांगला संस्कार द्या, ज्या मुलाला संस्कार आहे. तो कधीही अपयशी ठरू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांचे विधान वादात पडताना दिसत आहे.

हेही वाचा - भारतीय हवाई दलाच्या मिग -21 विमानाचा अपघात; वैमानिकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.