भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झालेल्या वायुगळती दुर्घटनेला 36 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले आहे की, या दुर्घटनेत ठार झालेल्यांच्या विधवांना पेन्शन पुन्हा सुरू केली जाईल आणि या घटनेच्या स्मरणार्थ स्मारकही बांधले जाईल. यामुळे लोकांना या दुर्घटनेतून धडा घेता येईल.
राजधानीत बरकतुल्ला भवन येथे (सेंट्रल लायब्ररी) येथे झालेल्या प्रार्थना सभेत दोन ते तीन डिसेंबर दरम्यान मध्यरात्री झालेल्या युनियन कार्बाईड कंपनीच्या गॅस प्लँटमधून मोठ्या प्रमाणात गळती झालेल्या मिथाईल आयसोसायनाईड वायूमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेला 36 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, 'वायू दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या विधवांना मिळणारी एक हजार रुपयांची पेन्शन 2019 पासून बंद आहे. ती पुन्हा सुरू केली जाईल.'
हेही वाचा - चीनबरोबरच्या सीमावादात भारतीय नौदलाचा हिंदी महासागरात दरारा
चौहान म्हणाले की, भोपाळमध्ये या घटनेच्या स्मरणार्थ स्मारक बांधले जाईल, जेणेकरून लोकांना धडा मिळेल. नागासकी आणि हिरोशिमा येथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर, तेथे स्मारक तयार केले गेले. यावरून आपल्याला यानंतर पुन्हा अणुहल्ला होऊ नये. भोपाळ दुर्घटनेचेही स्मारक येथे बांधले जाईल आणि लोकांना यातून योग्य अशा घटना टाळण्यासाठी काळजी घेण्याची शिकवण मिळेल.
हेही वाचा - त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे खास 'आयुर्वस्त्र'