ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘हुनर हाट’चे उद्घाटन, वाचा काय आहे हुनर हाट - , वाचा काय आहे हुनर हाट

केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित 28 व्या ‘हुनर हाट’चे उद्घाटन आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यात सांगितिक, कलाकुसरीच्या वस्तू, विविध राज्यांचे खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

प्रमोद सावंत यांच्या हस्ते हुनर हाटचे उद्घाटन

author img

By

Published : Mar 29, 2021, 7:16 PM IST

पणजी - केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित 28 व्या ‘हुनर हाट’चे उद्घाटन आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस हार्दिक, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासह केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव पी.के. दास आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हुनर हाटचे उद्घाटन करताना

यावेळी बोलताना डॉ सावंत म्हणाले, ‘हुनर हाट’ मुळे देशासोबत गोव्यातील कारागिरांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जास्तीत जास्त लोकांनी हुनर हाटला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे. अशा उपक्रमामुळे कला आणि संस्कृतीचे आदानप्रदान होण्यास मदत होते. देशाची संस्कृती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. ‘हुनर हाट’ हा स्थानिक कलाकार, कारागीर आणि व्यवसायाशी निगडीत यशस्वी उपक्रम असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. ‘हुनर हाट’मुळे आतापर्यंत साडेपाच लाख लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘हुनर हाट’ हा स्वदेशी कलाकारांना प्रोत्साहन देणारा मंच आहे. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना हुनरहाटच्या माध्यमातून 7 लाख 50 हजार कारागीरांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

स्वदेशी कलात्मक आणि हस्तकला उत्पादनांच्या 28 वा ‘हुनर हाट’ उपक्रम गोव्यात आयोजित करण्यात आला असून, तो 4 एप्रिलपर्यंत सुरू राहील. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतल्या कारागीरांच्या स्वदेशी आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या अनोख्या वस्तू आणि उत्पादने या ‘हुनर हाट’ मध्ये विक्री आणि आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत.

कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी मनोगत व्यक्त करताना

हेही वाचा - बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप

काय आहे हुनर हाट
कलमकारी, बिद्री, उदाईगिरी लाकडी कटलरी, बांबू,ताग यापासून बनवलेली उत्पादने, मधुबनी चित्रकलेचा आविष्कार घडवणाऱ्या चित्रकृती, मुंगा सिल्क, टसर सिल्क, चामड्याची उत्पादने, संगमरवरी वस्तू, चंदन उत्पादने, कशिदा काम, चंदेरी साड्या, कुंदन काम केलेले दाग दागिने, काचेच्या वस्तू, लाकडी, मातीच्या तसेच पितळी वस्तू, हातमाग उत्पादने हुनर हाट मध्ये मांडण्यात येत आहेत. हुनर हाट मधल्या बावर्चीखाना’ मध्ये मोगलाई, दक्षिण भारतीय, गोवा, मल्याळी, पंजाबी, बंगाली अशा पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आस्वादही लोकांना घेता येईल.

नक्वी हुनर हाटमधील वस्तू पाहताना
नक्वी हुनर हाटमधील वस्तू पाहताना

हेही वाचा - केजरीवालांना मोठा धक्का; GNCTD विधेयक राष्ट्रपतींकडून मंजूर

सांगितिक कार्यक्रम
याबरोबरच रूपसिंग राठोड (27 मार्च), सुदेश भोसले (28 मार्च), अल्ताफ राजा आणि राणी इंद्राणी (29 मार्च); निजामी ब्रदर्स (30 मार्च), गुरदास मान ज्युनियर (31 मार्च), प्रेम भाटिया (1 एप्रिल), विनोद राठोड आणि विनोदवीर सुदेश लेहरी (2 एप्रिल), गुरु रंधावा (3 एप्रिल), शिबानी कश्यप (4 एप्रिल) हे कलाकार “हुनार हाट” मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

अधिक माहितीसाठी http://hunarhaat.org या वेब पोर्टलला भेट द्यावे. देशातले आणि परदेशातले लोकही या कारागीरांच्या स्वदेशी वस्तू डिजिटल आणि ऑनलाईन खरेदी करू शकतात.यापुढचा 'हुनर हाट' डेहरादूनमध्ये (16 एप्रिल ते 25 एप्रिल), सुरत (26 एप्रिल ते 5 मे) या काळात आयोजित केला जाईल. याशिवाय कोटा, हैदराबाद, मुंबई, जयपूर, पाटणा, प्रयागराज, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, जम्मू-काश्मीर या ठिकाणीही या वर्षी हुनर हाट आयोजित जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.