पणजी (गोवा) - गोव्यातील सांत जसिंतो या बोटावर नौदलाला स्थानिकांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यास मनाई करण्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणारही नाही असेही त्यांनी टिव्टमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावर स्थानिक फादर आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ध्वजारोहण केले. रविवारी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी अधिकृत ध्वजारोहण होईल.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी सुरक्षा मंत्रालयाने देशातील सर्व बेटावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नौदलाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. याआधी मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे नौदलाला ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनीही स्थानिक नागरिकांना विनंती केली.
काय आहे प्रकरण ?
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने मुरगाव तालुक्यातील सांत जसिंतो बेटावर ध्वजारोहण करण्याचे ठरवले. शुक्रवारी ध्वजारोहणाची तयारी करण्यासाठी नौदलाचे काही अधिकारी व त्यांची काही माणसे या बेटावर अवजारे घेऊन आली होती, हे समजताच त्यांनी या उपक्रमाला विरोध केला. त्यामुळे नौदलाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
या प्रकरणावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सामंत यांनी टिव्टरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सांत जसिंतो या बेटावरील काही नागरिकांनी नौदलाला ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारली. हे अत्यंत लज्जास्पद आणि वाईट आहे. मी या कृत्याचा निषेध करतो. असे प्रकरण खपवून घेतले जाणार नाही. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नौदलाला ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याला गोवा पोलीसांचे संपूर्ण सहकार्य मिळेल असेही सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नौदलाचे केले अभिनंदन
सांत जासिंतो बेटावर नौदल अधिकाऱ्यांनी येथील स्थानिक नागरिक आणि चर्चच्या मुख्य पाद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण केले, याबद्दल मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ट्विटरद्वारे नौदलाचे अभिनंदन केले.
हेही वाचा - Pathankot Air Base Attack भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने, खळबळजनक खुलासा