पटना (बिहार) - मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांची मंगळवार (दि. 13 सप्टेंबर)रोजी संध्याकाळी भेट झाली. मात्र, या बैठकीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन वर्मा यांनी ही भेट घडवून आणली असी सुत्रांची माहिती आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, प्रशात किशोर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. (Prashant Kishor CM nitish meeting) अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या बातम्या ही अफवा आहे. त्याचबरोबर या बैठकीबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. याआधीही प्रशांत किशोर यांची आणि नितीश कुमार यांची पवन वर्मा यांनी भेट घालून दिली होती त्यानंतर दोघेही २०२० मध्ये वेगळे झाले होते.
प्रशांत किशोर हे सध्या जन सूरज अभियान राबवत असून २ ऑक्टोबरपासून पदयात्रा काढणार आहेत. मात्र, प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या भेटीनंतर राजकीय खळबळ माजली आहे. मात्र, याला मुख्यमंत्री सचिवालयाकडून दुजोरा दिला जात नाही किंवा जेडीयूचा कोणताही नेता यावर काही बोलत नाही. त्याचवेळी नितीश कुमार विरोधी एकजुटीचा प्रचार करत आहेत. नुकतेच ते चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.
प्रशांत किशोर यांनी यापूर्वीही नितीश कुमार यांच्यासाठी काम केले आहे. 2015 मध्ये महाआघाडीचे सरकार बनवण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिहारमधील सात निदान योजना ही प्रशांत किशोर यांची देणगी आहे. यापूर्वी प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. मात्र, आता पवन वर्मा पाटण्यात आल्यानंतर प्रशांत किशोर नितीश कुमारांना भेटू शकतात अशी चर्चा होती. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार प्रशांत किशोर आणि तिकडे नितीश कुमार यांची भेट झाल्याची चर्चा आहे.