नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लाक्षणीक उपोषण करणार आहेत. देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिवस अन्नत्याग करावा, असे आवाहन त्यांनी देशातील जनता आणि कार्यकर्त्यांना केले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणत आहेत. या आंदोलनामध्ये लष्कारातील काही निवृत्त जवान आहेत. जे देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढले. तसेच आंदोलनाला गायक, अभिनेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्वच देशद्रोही आहेत का, असा सवाल त्यांनी भाजपाला केला. आंदोलनाच्या समर्थनासाठी देशातील अनेक व्यापारी आणि वकील पुढे आले आहेत, असे ते म्हणाले.
सामान्य माणूस शेतकऱ्यांच्या पाठिशी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जेव्हा आंदोलन तेव्हा काँग्रेस सरकारने आंदोलनाला बदनाम केले होते. आम्हाला देशद्रोही घोषित केले होते. आज तेच काम भाजपा सरकार करत आहे. आज देशातील सामान्य माणूस शेतकऱ्यांच्या पाठिशी असून कृषी कायद्यांच्या विरोधात आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
केंद्र सरकारने अंहकार सोडावा -
कृषी कायद्यांमुळे महागाई वाढणार आहे. केंद्र सरकारने अंहकार सोडावा. जर जनता या कायद्यांच्या विरोधात आहे. तर कृषी कायदे सरकारने रद्द केले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. यापूर्वी केजरीवाल यांनी सरकारला किमान आधारभूत किंमतीची तरतूद कायद्यात समाविष्ट करण्याची विनंती केली होती. जे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, त्यांची मुले सीमेवरही लढत आहेत. या शेतकऱ्यांना दहशतावादी म्हटल्याने त्यांना कसे वाटत असेल. या मुद्द्यावर राजकारण करू नये, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा - 'कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही'; शेतकरी भूमिकेवर ठाम