ETV Bharat / bharat

'लव्ह जिहाद भाजपा नेत्यांच्या मुला-मुलींना लागू होता का, ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केलयं' - लव्ह जिहाद न्यूज

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लव्ह जिहादवरून भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. भाजपा नेत्यांच्या मुला-मुलींनी दुसऱ्या धर्मात लग्न केले आहे. त्यांनाही हा लव्ह जिहाद कायदा लागू होता का, असा खोचक सवाल त्यांनी केला.

भूपेश बघेल
भूपेश बघेल
author img

By

Published : Nov 21, 2020, 7:05 PM IST

रायपूर - मध्यप्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. यावरून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. भाजपा रिकामटेकडी आहे. तिहेरी तलाकनंतर आता त्यांनी लव्ह जिहाद आणले आहे. लव्ह जिहाद हा कायदा भाजपाच्या नेत्यांना लागू होतो का, ज्यांच्या मुला-मुलींना धर्माच्या बाहेर लग्न केले आहे ? असा खोचक सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भाजपावर टीका

भाजपला काहीच काम नसून भाजपने आता हा लव्ह जिहाद आणलं आहे. भाजपा नेत्यांच्या मुला-मुलींनी दुसऱ्या धर्मात लग्न केले आहे. त्यांनाही हा लव्ह जिहाद कायदा लागू होता का, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी मुरली मनोहर जोशी, सुब्रमण्यम स्वामी आणि लालकृष्ण आडवानी यांची नावे घेतली. लोकांना जोडण्यापेक्षा भाजप फक्त लोकांचे विभाजन करण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.

लव्ह जिहादवरून अशोक गेहलोत यांची भाजपावर टीका -

यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लव्ह जिहादवरून भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. भाजपाने देशाचे विभाजन करण्यासाठी आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी लव्ह जिहाद हा शब्द निर्माण केला आहे. विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, त्याला आळा घालण्यासाठी कायदा आणणे पूर्णपणे घटनाबाह्य असून हा कायदा न्यायालयात टिकणार. जिहादला प्रेमात स्थान नाही, असे गेहलोत म्हणाले होते.

मध्य प्रदेशच्या अधिवेशनात 'लव्ह जिहाद'वर कायदा -

मध्य प्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरे आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने सरकार 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्यात येईल.

हेही वाचा - कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सीबीआयची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.