ETV Bharat / bharat

ज्या दिवशी मनीष यांचे न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केले त्याच दिवशी सीबीआयची रेड ही शोकांतिका, केजरीवाल यांचा भाजपवर घणाघात - सिसोदिया यांचे छायाचित्र अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्याबाबत पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर गंभीर आरोप केले. दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सीबीआयचे छापे पडत असल्याचे ते म्हणाले. ज्या दिवशी मनीष यांचे न्यूयॉर्क टाइम्समध्ये कौतुक केले. त्याच दिवशी सीबीआयची रेड ही शोकांतिका आहे असा टोला केजरीवाल यांनी भाजपला लगावला आहे.

केजरीवाल यांचा भाजपवर घणाघात
केजरीवाल यांचा भाजपवर घणाघात
author img

By

Published : Aug 19, 2022, 2:17 PM IST

Updated : Aug 19, 2022, 2:23 PM IST

नवी दिल्ली दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने आज छापा टाकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, ज्या दिवशी सिसोदिया यांचे छायाचित्र अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी सीबीआयने छापा टाकला. दिल्लीच्या शैक्षणिक क्रांतीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून घाबरवायचे काम ते करत आहे, असे ते म्हणाले.

आज देश नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जगातील सर्वात बलाढ्य देश, अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिल्ली सरकारची शिक्षण व्यवस्था आणि उपमुख्यमंत्र्यांची बातमी प्रसिद्ध केली आहे. आज देशाला नंबर वन बनवण्यात निसर्गही साथ देत आहे. गेल्या सात वर्षांत मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने अनेकदा छापे टाकले आहेत. यापूर्वीही काही सापडले नाही, आताही काही सापडणार नाही. - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यामुळे आज सकाळपासून दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे अबकारी धोरणातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या घरासह एकूण २१ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. यापैकी चार ठिकाणे अशी आहेत ज्यात दिल्ली सरकारचे अधिकारी आणि मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत देश आहे. तिथल्या सर्वात मोठ्या वृत्तपत्रात, न्यूयॉर्क टाइम्समध्ये कौतुकाच्या बातम्या छापून येणे फार कठीण आहे. त्यात काल दिल्लीतील शाळांची बातमी प्रसिद्ध झाली. त्यात दिल्लीत उत्कृष्ट शाळा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात मनीष सिसोदिया यांचा फोटो छापला आहे. जगातील बड्या नेत्यांना त्यात यायचे आहे. एकप्रकारे मनीष सिसोदिया यांना जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री घोषित करण्यात आले आहे.

केजरीवाल म्हणाले की, कालच आम्ही घोषणा केली होती की, आपण सर्वांनी मिळून भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनवायचा आहे. निसर्ग आपल्याला साथ देतो. भारताला नंबर वन बनवण्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. आजपर्यंत भारत का मागे राहिला हे देशातील जनतेला जाणून घ्यायचे आहे. यामध्ये अनेक अडथळे येतील. आज सीबीआय मनीष सिसोदिया यांना घेरण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. 7 वर्षात यापूर्वीही अनेक छापे पडले आहेत, हा पहिलाच छापा नाही. काही मिळाले नाही, अजूनही काही मिळणार नाही. सीबीआय आपले काम करत आहे. त्यांना वरून आदेश आहेत. ते त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू.

भारताला जगातील नंबर वन देश बनवण्यासाठी एकत्र या. या मिशनमध्ये सामील होण्यासाठी 9510001000 वर मिस कॉल द्या. देशातील 130 कोटी लोकांना जोडायचे आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि त्यात मनीष सिसोदिया यांच्या प्रकाशित फोटोवर केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया हे दिल्ली आणि देशाचे नव्हे तर जगाचे उत्तम शिक्षणमंत्री आहेत हे आज जगाने मान्य केले आहे. त्यामुळे सीबीआयचे छापे टाकून त्यांना त्रास दिला जात आहे.

हेही वाचा - सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर भाजप नेत्यांचा हल्लाबोल

Last Updated : Aug 19, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.