नैनिताल - उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. नैनिताल जवळील कैंची धाममध्ये ढगफुटी झाल्याने मंदिराचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. कैंची धाम नीम करौली बाबा धाममध्ये दरवर्षी 15 जूनला ही यात्रा भरते. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरात जास्त गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
यापूर्वी दशरत डांडा पर्वतावर ढगफुटी झाली होती. दशरथ दांडा पर्वतावर ढगफुटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसान झाले. आज मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली आहे.
शांता नदीच्या वरच्या टोकावर असलेल्या दशरथ डांडा पर्व नावाच्या ठिकाणी ढगफुटी झाल्याने नदीला पूर आला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देवप्रयाग पोलीस स्टेशनचे प्रमुख महिपालसिंग रावत यांनी सांगितले.
चमोली हिमस्खलन -
काही दिवसांपूर्वीच चमोली जिल्ह्यात हिमसस्खलनाची दुर्घटना झाली होती. चमोली जिल्ह्यात ७ फेब्रुवारीला हिमकडा कोसळून नदीला पूर आला होता. या नदीमार्गावर ऋषीगंगा आणि तपोवन या दोन ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. अनेक कामगार प्रकल्पाच्या बोगद्यासह विविध भागात काम करत असताना अचानक पुराचा लोंढा आला. यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही बोगद्यात अडकले होते. यात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - तुरुंगात पिण्यासाठी पाणी अन् कमोड नाही; पप्पू यादव बसले उपोषणाला