तिरूवअनंतपुरम (केरळ) - केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे एक विचित्र घटना घडली आहे. फरसाण खाताना तुकडा गळ्यात अडकून पहिल्या वर्गातील विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. केवळ फरसाण खाताना या मुलीचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
निवेदिता असे या मृत मुलीचे नाव आहे. आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. कॉटन हील स्कूलमध्ये ती पहिल्या वर्गात शिकत होती. रविवारी दुपारच्या नाश्त्यात तिनं फरसाण घेतलं. त्यावेळी ती घरी होती. फरसाण खाल्ल्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे निवेदिताला तातडीने शांतीविला रूग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर शांतीविला रूग्णालयातून एसएटी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र मुलीचा जीव वाचला नाही. थ्रीक्कनापुरम येथील मुळनिवासी असलेल्या राजेश आणि कविता यांची निवेदिता ही एकुलती एक मुलगी होती.