ETV Bharat / bharat

Student Died Of Heart Attack : दहावीच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

कर्नाटकात दहावीत शिकण्याऱ्या एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याने क्रीडा स्पर्धेत पारितोषिक पटकावले होते, मात्र बक्षीस घेण्यापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. (class 10 student died of heart attack).

Heart Attack
हृदयविकाराचा झटका
author img

By

Published : Aug 4, 2023, 4:40 PM IST

तुमकूर (कर्नाटक) : कर्नाटकातील तुमकूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील चिक्कथोटलुकेरेजवळ क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 वी च्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भीमाशंकर (15) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. यादगिरी जिल्ह्यातील सूरपूर येथील रहिवासी असलेला भीमाशंकर तुमकूर तालुक्यातील बेलादरा सरकारी हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता.

पारितोषिक घेण्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर हा चिक्कथोटलुकेरेजवळ आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. कार्यक्रमात आयोजित केलेल्या रिले स्पर्धेत त्याने दुसरे पारितोषिक पटकावले, मात्र पारितोषिक घेण्यापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अवघ्या 15 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला : तुमकूर जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम केल्यानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा हृदयविकाराचा झटका असल्याचे दिसते. पोलिसांनी तपासासाठी एक पथक तयार केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हृदयविकारापासून वाचण्यासाठी 'हे' करा : आजकाल जे तरुण त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात त्यांच्यात हृदयविकाराचा धोका वाढला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना या आजाराचा धोका जास्त आहे. अचानक अतिव्यायाम केल्यानेही अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे या आजारापासून दूर राहण्यासाठी तरुणांनी त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रक्तदाबातील चढउतारामुळे देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यासाठी झोपण्याच्या दोन तास आधी खाल्ले पाहिजे. यामुळे शरिरात ब्लड सर्कुलेशन चांगले होते व हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे डॉक्टर सांगतात. तसेच अतिव्यायाम टाळावा आणि व्यायाम करण्यापूर्वी वर्कआउट करावे, यामुळे या आजाराचा धोका कमी होतो, असे हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.