ETV Bharat / bharat

Nitish Kumar : महाराष्ट्रात सत्ता, बिहार गमावणार?, नितीश कुमारांचा सोनिया गांधींना फोन; जेडीयू, काँग्रेस, आरजेडी युतीची शक्यता - नितीश कुमारांचा सोनिया गांधींना फोन

जेडीयू लवकरच आरजेडी, डावे आणि काँग्रेसोबत सत्ता स्थापन करु शकते. त्याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत ( Cm Nitish Kumar Talks To Sonia Gandhi ) आहे.

nitish kumar soniya gandhi
nitish kumar soniya gandhi
author img

By

Published : Aug 8, 2022, 4:30 PM IST

पाटणा - बिहारमधील सत्ता भाजपच्या हातामधून जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपसोबत असलेली युती तोडण्याची शक्यता आहे. जेडीयू लवकरच आरजेडी, डावे आणि काँग्रेसोबत सत्ता स्थापन करु शकते. त्याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यारुपाने सत्ता आली. पण, बिहारमधील सत्ता जाण्याच्या मार्गावर ( Cm Nitish Kumar Talks To Sonia Gandhi ) आहे.

भाजपा पक्ष फोडण्याची भिती - माजी केंद्रीय मंत्री आर. सीपी. सिंह यांच्यामुळे भाजप आणि जेडीयू यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. नितीश कुमारांनी आर. सीपी. सिंहांना राज्यसभेचे तिकीट नाकारलं होते. त्यानंतर आर. सीपी. सिंहांना पक्षाला रामराम ठोकला. मागील काही दिवसांपासून आर. सीपी. सिंह यांना भाजपने आपल्या तंबूत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नितीशकुमार नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना घेऊन भाजपने शिवसेना फोडली. तसेच, आर. सीपी. सिंह यांना सोबत घेऊन भाजप आपला पक्ष फोडेल अशी भिती नितीश कुमारांना वाटत आहे.

पाटणामधून सत्तासंघर्षांबाबात माहिती देताना प्रतिनिधी

मंगळवारच्या बैठकीत युतीचे भवितव्य अवलंबून - दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला जेडीयूचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. मंगळवारच्या बैठकीत जेडीयू आणि भाजपच्या युतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यातच नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी नितीश कुमांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - MH cabinet Expansion :अखेर ठरलं! 'या' दिवशी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.