ETV Bharat / bharat

Cinema Festival at Ramoji Film City : भारतीय सिनेसृष्टीची ११० वर्षे पूर्ण, रामोजी फिल्म सिटीत विशेष उत्सव सुरू - सिनेमॅटिक मनोरंजनाचा आनंद

Cinema Festival at Ramoji Film City : भारतीय सिनेसृष्टीची ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं रामोजी फिल्म सिटीत विशेष उत्सव सुरू झाला आहे. जगभरातील पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी चमचमणारी रामोजी फिल्मसिटी सज्ज झाली आहे.

Cinema Festival at Ramoji Film City
रामोजी फिल्म सिटीत विशेष उत्सव सुरू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 3:38 PM IST

हैदराबाद Cinema Festival at Ramoji Film City : येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्मसिटीमध्ये आज गुरुवार दि १३ ऑक्टोबरपासून भारतीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. देशातील चित्रपट सृष्टीला ११० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चित्रपटाची परंपरा सिनेमॅटिक मनोरंजन आणि कार्निव्हल परेड असा मनोरंजनाचा खजिना यानिमित्तानं येथे येणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येणार आहे. 12 तारखेच्या रात्रीपासून सुरू झालेला हा अभूतपूर्व उत्सव 46 दिवस चालणार आहे. रामोजी फिल्म सिटी, पर्यटकांचं यानिमित्तानं, चमचमत्या दुनियेत सजवलेल्या सौंदर्यपूर्ण वातावरणात स्वागत करत आहे.

भारतीय चित्रपटाची 110 वर्षे - पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामोजी फिल्म सिटीमध्ये भारतीय चित्रपटाची 110 वर्षे साजरी करण्यात येत आहेत. यानिमित्तानं रामोजी फिल्म सिटीला नविन रुपडं आलं आहे. रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, येथील वैशिष्ठ्यपूर्ण कारंजे आणि विविध खेळ फिल्मसिटीला भेट देणाऱ्या सर्वांनाच भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातून एक नवीन अनुभूती मिळणार आहे. फिल्मसिटीमध्ये नेहमीच विविध प्रकारच्या गुणदर्शनाचं प्रदर्शन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनाबरोबरच प्रत्येक वळणावर आश्चर्याने मंत्रमुग्ध करून ठेवते. फिल्मसिटी कार्निवल परेड ही एक पर्यटकांच्यासाठी अनोखी पर्वणीच ठरत आहे. निसर्गरम्य मार्गांवरून ही परेड जेव्हा सुरू होते. तेव्हा ती पाहणाऱ्यांना दुसऱ्या जगात घेऊन जाते.

सिनेमॅटिक मनोरंजनाचा आनंद - नेहमीच पर्यटकांची वर्दळ असलेल्या फिल्मसिटीमध्ये या सिनेमॅटिक मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. या भागातील दोन तेलुगु राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर भारतातील विविध भागांतून लोक नवीन अनुभूती घेण्यासाठी येत आहेत. पक्षी उद्यान, धबधबे, महाकाय पाळणे, इलेक्ट्रिक ट्रेन राईड, घोडेस्वारी पाहून लहान मुलं खूपच आनंदी होत आहेत, असं मुलांनी सांगितलं.

तिकीट बुक करणाऱ्यांना विविध पॅकेज - फक्त लहान मुलेच नाही तर वृद्धांनाही या सगळ्याचा आनंद घेताना त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. संध्याकाळच्या वेळी फिल्मसिटी अशा काही झगमगाटामध्ये सजते की पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटतं. या सगळ्याचा आनंद लुटल्याचं ज्येष्ठांकडून मत व्यक्त होत आहे. 'महाभारतम सिनेवर्ल्ड'ची भुरळही पर्यटकांना पडत आहे. संध्याकाळी, असे म्हणतात की, चमकणारे दिवे पाहण्यासाठी दोन्ही डोळे पुरेसे वाटत नाहीत. या अद्भुत ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. पुढील महिन्याच्या २६ तारखेपर्यंत हे उत्सव सुरू राहणार आहेत. फिल्मसिटीच्या व्यवस्थापनाकडून तिकीट बुक करणाऱ्यांना विविध पॅकेजससह उत्तम सुविधांचा लाभ तत्परतेने देत आहे.

हेही वाचा...

Ramoji Film City : 'रामोजी फिल्म सिटी' आहे पर्यटकांना सर्व सुविधा देणारं वन स्टॉप सोल्युशन, एकदा भेट द्याच

IRCTC चे गोल्डन ट्रँगल टूर पॅकेज, रामोजी फिल्म सिटीसह 'या' ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.