ETV Bharat / bharat

Baghpat UP : बागपतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार! चर्चच्या पुजाऱ्याला अटक - बागपतमध्ये चर्चच्या पुजाऱ्याला अटक

यूपीच्या बागपत जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील चर्चच्या पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. ( Church Priest Arrested Baghpat In UP ) हे प्रकरण जिल्ह्यातील चंदीनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडले आहे. येथे चर्चसमोर राहणाऱ्या कुटुंबाने हा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे.

जिला संयुक्त चिकित्सालय, बागपत
जिला संयुक्त चिकित्सालय, बागपत
author img

By

Published : Apr 24, 2022, 12:36 PM IST

बागपत - यूपीच्या बागपत जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील चर्चच्या पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील चंदीनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडले आहे.येथे चर्चसमोर राहणाऱ्या कुटुंबाने हा आरोप केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. तर, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आईचा आरोप - मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका गावात शाळेजवळ एक अनुसूचित जातीचे कुटुंब राहते. त्यांची 11 वर्षाची मुलगी आहे. पीडितेच्या आईचा आरोप आहे की तिच्या मुलीला शाळेच्या व्यवस्थापक पुजाऱ्याने पैशाचे आमिष दाखवले. आणि त्यानंतर तिला एका खोलीत नेले, जिथे आरोपी पुजाऱ्याने तिला गलिच्छ फिल्म दाखवून विनयभंग आणि बलात्काराची घटना घडवली.

आरोपींची पोलीस चौकशी - याची माहिती पीडित मुलीने घरी जाऊन घरच्यांना दिली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले अन् त्यांनी तपास केला. यानंतर आरोपी शाळा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या या प्रकरणातील आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

गुन्हा दाखल करून पीडितेचे मेडिकल - त्याचवेळी, सीओ खेकरा विजय चौधरी यांनी सांगितले की, 23/4/22 रोजी एका व्यक्तीने चंदीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, त्याच्या अल्पवयीन मुलीवर त्याच्या घरासमोर असलेल्या चर्चच्या पुजाऱ्याने बलात्कार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Russia Ukraine War 60Th Day : युद्धाला दोन महिने पुर्ण! अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री किव दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.