ETV Bharat / bharat

Ganesh Chaturthi 2022 : 'येथे' विराजमान झालेत चॉकलेटचे गणराय; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

आग्रा येथे गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर चॉकलेट गणेश ( Chocolati Ganesh Of Agra ) बनवण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या मूर्तीची खासियत.

Chocolati Ganesh Of Agra
आग्राचा चॉकलेट गणेश
author img

By

Published : Sep 1, 2022, 10:44 AM IST

आग्रा - शहरातील गणेशोत्सवानिमित्त एका मिठाई व्यापाऱ्याने चॉकलेटपासून गजाननाची मूर्ती ( Idol of Gajanana from chocolate ) तयार केली आहे. तीन फूट उंच आणि 80 किलो वजनाची ही मूर्ती पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून त्याच्या दुकानात पोहोचत आहेत. तर या मूर्तीचे 11 व्या दिवशी थंड दुधात विसर्जन करण्यात येणार आहे. ( Chocolati Ganesh Of Agra )

गणेश महोत्सवात आग्राचा चॉकलेट गणेश

गणेशमूर्तीचे 200 लिटर थंड दुधात विसर्जन - दुकानमालक यश भगत सांगतात की, दरवर्षी गणपती बाप्पाचे भक्त पीओपीच्या मूर्ती घरी आणतात आणि नंतर त्या नद्यांमध्ये विसर्जित करतात. त्यामुळे नद्यांमध्ये प्रदूषण होते. गणेशमूर्तीचा अनादर होतो. अशा परिस्थितीत चॉकलेटी गणपती तयार करण्याची कल्पना सुचली. हा पुतळा तयार करण्यासाठी एक आठवडा लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, 11 व्या दिवशी चॉकलेटच्या गणेशमूर्तीचे 200 लिटर थंड दुधात विसर्जन केले जाईल. विसर्जनानंतर चॉकलेट द्रव होऊन वितळेल. यामुळे चॉकलेट शेक होईल. तो चॉकलेट शेक बाप्पाच्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.

गणेशमूर्ती १६ अंश सेल्सिअस तापमानात तयार त्यांनी सांगितले की, ही मूर्ती १६ अंश सेल्सिअस तापमानात तयार करण्यात आली आहे. या मूर्तीतील सर्व रंग नैसर्गिक आहेत. ही मूर्ती वितळू नये म्हणून दहा दिवस 16 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवली जाईल. यानंतर मूर्तीचे थंड दुधात विसर्जन केले जाईल.

हेही वाचा Ganeshotsav 2022 आंध्र प्रदेशातील सोन्याचा गणपती ठरतोय भाविकांचे आकर्षणाचे केंद्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.