ETV Bharat / bharat

भारत-बांगलादेश सीमेवर चिनी नागरिकाला बीएसएफकडून अटक - भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा

भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर एका चिनी नागरिकाला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, चायनीज पासपोर्ट व इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

बीएसएफ
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:49 PM IST

कोलकाता - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर एका चिनी नागरिकाला अटक केली. मालदा जिल्ह्यातील सीमेजवळ बीएसएफच्या पथकाने त्याला पकडले. बीएसएफ, स्थानिक पोलीस आणि गुप्तहेर संस्थाकडून त्याची चौकशी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती उघडकीस येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्याच्याकडून लॅपटॉप, चायनीज पासपोर्ट व इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

त्याचे नाव होन जूं असं आहे. त्याच्याकडे बांगलादेशचा व्हिसा होता. बीएसएफची 159 नंबर बटालियन पेट्रोलिंग करत होती. तेव्हा त्यांना सदर व्यक्ती संशयास्पद वाटली. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

एटीएसकडून दो रोहिंग्याना अटक

दोन दिवसांपूर्वी एटीएसने बांगलादेशमार्गे अवैधपणे भारतात आलेल्या दोन रोहिंग्यांना अटक केली होती. दोघांनाही एटीएसच्या पथकाने सोमवारी सायंकाळी गाझियाबाद येथून अटक केली. एटीएसच्या निवेदनानुसार, नूर आलम आणि अमीर हुसेन हे मूळचे म्यानमारच्या राखिन प्रांतातील आहेत. ज्यात नूर आलम मेरठ जिल्ह्यातील दरबार लबर खास येथे स्थायिक झाला आहे आणि अमीर हुसेन यांचे दिल्लीचा खजुरी खास परिसरात राहतो.

यापूर्वीही एका चीनी नागरिकाला केली होते अटक -

ऑगस्ट 2020 मध्ये भारत-नेपाळच्या सोनौली सीमेवर अवैधपणे घुसखोरी करत असताना एका चिनी नागरिकाला एसएसबीच्या जवानांनी अटक केली होती. अटक केलेल्या चिनी नागरिकाकडे योग्य पासपोर्ट होता. परंतु तो चुकीच्या पद्धतीने भारतात घुसखोरी करत होता. चौकशीनंतर असे आढळले, की त्याचे नाव सेन्ली आहे आणि तो हुबेई प्रांताचा नागरिक आहे. नेपाळमधील त्यांचा टूरिस्ट व्हिसा संपला होता. त्यामुळे तो भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.