ETV Bharat / bharat

Gujarat Betting Scam : चिनी नागरिकाचा गुजरातमध्ये मोठा स्कॅम! ९ दिवसांत १४०० कोटींची फसवणूक, तब्बल वर्षानंतर प्रकरण जनतेसमोर

गुजरातमध्ये एका चिनी नागरिकाने फसव्या अ‍ॅपच्या माध्यमातून नऊ दिवसांत सुमारे १४०० कोटी रुपयांची फसवणूक केली. गुजरात पोलिसांनी या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्येच एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली, परंतु तोपर्यंत मास्टरमाइंड फरार झाला होता. आता तब्बल एका वर्षानंतर या प्रकरणाची माहिती समोर आलीय. (Chinese man developed fake betting app)

Scam
Scam
author img

By

Published : Aug 18, 2023, 4:59 PM IST

अहमदाबाद : गुजरातमध्ये फसवणुकीची एक गंभीर घटना उघडकीस आलीय. ही घटना एका वर्षापूर्वी घडली होती, जिची माहिती आता समोर येतेय. येथे एका चिनी नागरिकाने स्थानिक भागीदारांसह एक फुटबॉल बेटिंग अ‍ॅप विकसित केलं. याद्वारे त्याने नऊ दिवसात सुमारे १,२०० लोकांना तब्बल १४०० कोटी रुपयांना फसवलं. (Chinese man developed fake betting app)

चिनी नागरिकाने फसवले : प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरात पोलिसांनी फसवणुकीमागील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली. पोलिसांनी या फसवणुकीमागे चीनच्या शेनझेन भागातील रहिवासी वू युआनबे याचा हात असल्याचे सांगितले. युआनबेने गुजरातमधील पाटण आणि बनासकांठा या भागात ही फसवणूक केली. विशेष म्हणजे, सीआयडीला प्रथम जून २०२२ मध्ये या फसवणुकीची माहिती मिळाली होती.

फसवे अ‍ॅप लॉन्च केले : हा चिनी नागरिक 'दानी डेटा' नावाच्या अ‍ॅपद्वारे गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील लोकांची फसवणूक करत होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तपास सुरू केला असता याचे उत्तर गुजरातमधील व्यक्तींशी संबंध उघड झाले. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की युआन बे हा चिनी नागरिक २०२० ते २०२२ दरम्यान भारतात होता. तो पाटण आणि बनासकांठा येथील स्थानिक लोकांशी संवाद साधत होता. आर्थिक फायद्याचे आश्वासन देऊन, युआन बे आणि त्याच्या गुजरातमधील सहकाऱ्यांनी मे २०२२ मध्ये एक फसवे अ‍ॅप लॉन्च केले. त्यांनी वापरकर्त्यांना अ‍ॅपद्वारे बेटिंग करून भरीव परतावा देण्याचे आमिष दाखवले. ते या अ‍ॅपद्वारे दररोज सरासरी २०० कोटी रुपये जमा करत होते.

चीनला पळून जाण्यात यशस्वी : १५ ते ७५ वयोगटातील लोक या अ‍ॅपवर सट्टा लावत असत. परंतु केवळ नऊ दिवसांच्या ऑपरेशननंतर, अ‍ॅपने काम करणे बंद केले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तपासानंतर सीआयडीच्या सायबर सेलने नऊ जणांना ताब्यात घेतले. हवाला नेटवर्कद्वारे पैसे पाठवण्यात ते युआनबे याला मदत करत होते. गुजरात पोलिसांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पाटणमध्ये फसवणूक आणि आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली. परंतु तोपर्यंत यामागचा मास्टरमाईंड गायब झाला होता. युआनबे चीनला पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याच्यावर होणारी संभाव्य कायदेशीर कारवाई टळली.

प्रत्यार्पणाची प्रक्रिया रखडली : सीआयडीने अद्याप युआनबेविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केलेले नाहीत, ज्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया रखडलीय. तो अद्यापही सक्रिय असून चीनमधील शेनझेन, हाँगकाँग तसेच सिंगापूरसारख्या भागात नेटवर्क चालवत असल्याचे पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले. गेल्या मार्चमध्ये सीआयडीने या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र दाखल केले.

हेही वाचा :

  1. Social Media Account Hacking : पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; अनेकांकडे पैशाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.