नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी उच्चस्तरीय भेटीसाठी भारतात आले आहेत. वांग काबूलहून नवी दिल्लीत पोचले. शुक्रवारी सकाळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अनियोजित भेटीचा उद्देश युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीत चीनने मोठी भूमिका बजावण्याशी संबंधित असल्याचे कळले आहे. चीननेही रशियाला आर्थिक निर्बंधांना सामोरे जाण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
-
#WATCH | Chinese Foreign Minister Wang Yi meets External Affairs Minister S Jaishankar for delegation-level talks in Delhi pic.twitter.com/Xv3MoFhFWE
— ANI (@ANI) March 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Chinese Foreign Minister Wang Yi meets External Affairs Minister S Jaishankar for delegation-level talks in Delhi pic.twitter.com/Xv3MoFhFWE
— ANI (@ANI) March 25, 2022#WATCH | Chinese Foreign Minister Wang Yi meets External Affairs Minister S Jaishankar for delegation-level talks in Delhi pic.twitter.com/Xv3MoFhFWE
— ANI (@ANI) March 25, 2022
चर्चेत भारत पूर्व लडाख सीमा विवादावरून आपले लक्ष हटवण्याची शक्यता नाही. स्टँडऑफच्या उर्वरित पोझिशन्समधून सैन्याच्या संपूर्ण माघारीसाठी भारताने दबाव आणणे देखील अपेक्षित आहे.असे सांगितले जात आहे. सीमा चर्चेसाठी विशेष प्रतिनिधी म्हणून वांग काम पाहत आहेत त्यांच्या आणि डोभाल यांच्या बैठकीत सीमा प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. वांग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट भारतीय बाजू सुकर करेल का हे पाहणे औत्सूक्याचे आहे. युक्रेन संकट हा पण चर्चेतील आणखी एक प्रमुख मुद्दा असेल.