ETV Bharat / bharat

Chief Twit Elon Musk : इलॉन मस्क यांच्या हाती 'ट्विटरचा लगाम'; संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त - चालक मंडळ बरखास्त केले

ट्विटरचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना काढून टाकल्यानंतर इलॉन मस्क यांनी आता कंपनीच्या सर्व संचालक मंडळाच्या संचालकांनाही पदमुक्त केले (dissolves Twitter board After buying Twitter) आहे. आता त्यांनी स्वत: कमान हाती घेतली (Elon Musk dissolves Twitter board) आहे.

Chief Twit Elon Musk
इलॉन मस्क
author img

By

Published : Nov 1, 2022, 9:42 AM IST

कॅलिफोर्निया : ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनी बोर्ड विसर्जित (dissolves Twitter board After buying Twitter) केले. इलॉन मस्क यांनी सोमवारी मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. आता ते ट्विटरचा एकमेव संचालक बनले आहे. मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अनेक बदलांपैकी संचालक मंडळ बरखास्त करणे Elon Musk (dissolves Twitter board) आहे.

मस्क ट्विटरचे एकमेव संचालक : यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क हे ट्विटरचे एकमेव संचालक बनले आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की -ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्याऐवजी इलॉन मस्क स्वतःच त्याचे कामकाज सांभाळतील. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल केले. यामध्ये प्रामुख्याने कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल सीएफओ नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार-पॉलिसी प्रमुख विजया गड्डे यांच्यासह कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात (Chief Twit Elon Musk) आले.

संचालक मंडळ बरखास्त : यासह सोमवारी त्यांनी संचालक मंडळही बरखास्त केले. बोर्ड सदस्यांमध्ये ब्रेट टेलर, पराग अग्रवाल, ओमिड कोरडेस्तानी, डेव्हिड रोसेनब्लाट, मार्था लेन फॉक्स, पॅट्रिक पिचेट, एगॉन डर्बन, फी-फेई ली आणि मिमी अलेमायेहो यांचा समावेश होता. कंपनीच्या निवेदनानुसार हे सर्वजण यापुढे बोर्डावर काम करणार (Elon Musk Twitter) नाहीत.

सामग्री नियंत्रण परिषद : अहवालानुसार, विलीनीकरणाच्या करारातील अटींनुसार इलॉन मस्क हे कंपनीचे एकमेव संचालक बनले आहेत. कंटेंट मॉडरेशन धोरणांमधील बदलाबाबत, मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ट्विटर विविध दृष्टीकोनांसह सामग्री नियंत्रण परिषद स्थापन करेल. ती परिषद गठीत होण्यापूर्वी सामग्रीबाबत कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.