ETV Bharat / bharat

Morbi Nagar Palika : मोरबी दुर्घटनेप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंग निलंबित - Morbi Bridge Collapse Incident

गुजरातमधील मोरबी दुर्घटनेप्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंग झाला ( Nagar Palika Sandip singh Zala ) यांना निलंबित करण्यात आले आहे. मच्छू नदीवरील केबल पूल अचानक कोसळल्याने 135 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ( Morbi Bridge Collapse Incident )

Morbi Nagar Palika
मोरबी दुर्घटनेप्रकरण
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:14 PM IST

गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने पहिली मोठी कारवाई केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंह झाला ( Nagar Palika Sandip singh Zala ) यांना निलंबित करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर सरकारी अधिकाऱ्याविरुद्धची ही पहिली मोठी कारवाई आहे. मोरबीमध्ये रविवारी संध्याकाळी केबल ब्रिज कोसळला होता. ( Morbi Bridge Collapse Incident )

मुख्य अधिकारी संदीप सिंग जाला निलंबित : मोरबी शहरातील पूल कोसळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने मोरबी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप सिंग जाला यांना निलंबित केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, रविवारी माचू नदीवरील हा ब्रिटीशकालीन पूल कोसळून झालेल्या घटनेत आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात ठार झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

निवासी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदाचा दिला कार्यभार : मोरबीचे जिल्हा अधिकारी जी. टी. पांड्या म्हणाले, 'राज्याच्या नगरविकास विभागाने मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंग झाला यांना निलंबित केले आहे. ते म्हणाले की, मोरबीच्या निवासी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोरबी नगरपालिकेने पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीचे कंत्राट ओरेवा समूहाला 15 वर्षांसाठी दिले होते. पूल कोसळण्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी : केबल पूल दुर्घटनेप्रकरणी एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नऊपैकी चौघांना मंगळवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली तर इतर पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक आणि दोन उपकंत्राटदारांना न्यायालयाने शनिवार, ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पाच जणांना पोलिस कोठडी : सरकारी वकील एचएस पांचाळ यांनी सांगितले की, मुख्य न्यायदंडाधिकारी एमजे खान यांनी सुरक्षा रक्षक आणि तिकीट बुकिंग क्लर्कसह अटक केलेल्या पाच जणांना पोलिस कोठडी न मागितल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ओरेवा या पुलाचे काम करणाऱ्या कंपनीचे आहेत. मोरबी नगरपालिकेने मंजूर केलेल्या ओरेवा या खासगी कंपनीमार्फत या पुलाचे काम सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.