ETV Bharat / bharat

Uddhav in Action : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती. मात्र त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांची पदावरून ( Shiv Sena leader ) हकालपट्टी करण्यात आली आहे. उर्वरित आमदारांवरही कारवाई केली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी

author img

By

Published : Jul 2, 2022, 6:31 AM IST

Updated : Jul 2, 2022, 7:00 AM IST

मुंबई - राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde removed ) यांच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेते पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली. बंडखोरी केलेल्या ३९ आमदारांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी

शिवसेनेत बंड - विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारासहित सुरतमार्गे आसामचे गुवाहाटी गाठले. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने बंडखोर आमदारांना आवाहन केले. विधिमंडळाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश काढला. बंडखोर आमदारांनी त्यालाही जुमानले नाही. तरीही शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती. मात्र पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्याने तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदावरून हकालपट्टी ( Shiv Sena leader ) करण्यात आली आहे. उर्वरित आमदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे (Eknath Shinde ).

बंडानंतर कारवाई - नुकतेच शिंदे यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले होते. बंडानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी परवाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनचे कारवाईचे निवेदन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे ( Uddhav in Action) . तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे. त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती. तसेच ते शिवसेनेचेच असतील असे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

Last Updated : Jul 2, 2022, 7:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.