गांधीनगर - गुजरात उच्च न्यायालयाचे (Gujarat High Court) मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखालील एका खटल्याची व्हर्च्युअल सुनावणी सुरू होती. सुनावणीवेळी एक आयपीएस अधिकारी कोकाकोल पित (IPS drink Coca-Cola) असल्याचे न्यायाधीशांच्या निदर्सनास आले. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त तक केलीच पण त्या पोलीस अधिकाऱयाला शिक्षाही सुनावली आहे. बार असोसिएशनसाठी कोकाकोलाचे 100 कॅन वाटण्याचे आदेश (distribute 100 cans of Coca-Cola) न्यायाधीशांनी पोलीस अधिकाऱ्याला दिले आहेत.
- काय घडलं नेमकं सुनावणीदरम्यान?
झालं असं की गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखालील एका प्रकरणाची व्हर्च्युअल सुनावणी सुरू होती. या सुनावणीसाठी प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून पोलीस अधिकाऱ्याला उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आयपीएस अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला हजर राहिले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली, वकिलांचा युक्तिवाद सुरू झाला. याचवेळी तो पोलीस अधिकारी कोल्ड ड्रिंक्स अर्थात कोकाकोला पित असल्याचे न्यायाधीशांच्या लक्षात आले. त्यांना कोल्ड ड्रिंक्सचा कॅन त्या पोलीस अधिकाऱयाचा हातात दिसला.
- सुनावणीवेळी आयपीएस पित होता कोकाकोला -
यावेळी न्यायाधीश म्हणाले हा पोलीस अधिकारी कोण? हा प्रकार लक्षात येताच अतिरिक्त सरकारी वकील (एजीपी) डीएम देवनानी यांनी पोलिसांच्यावतीने माफी मागितली. ते म्हणाला की, मी मनापासून माफी मागतो, मी त्यांना (पोलीस अधिकारी) त्यांचा व्हिडिओ कॅमेरा बंद करण्यास सांगतो.
- न्यायाधीशांनी सांगितला तो किस्सा -
या सर्व प्रकारावर न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. यावरच न थांबता त्यांनी यानिमित्ताने प्रश्नांचा भडीमार त्या पोलीस अधिकाऱ्यावर केला. असे वर्तवणूक करणे आयपीएस अधिकाऱ्याचे काम आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने असे वागणे योग्य आहे का? जर तुम्ही प्रत्यक्षात न्यायालयात उपस्थित असता तर तिथे तुम्ही कोल्ड ड्रिंक्सचा कॅन घेऊन आला असतात का? असे अनेक प्रश्न न्यायाधीशांनी विचारले. त्यानंतर न्यायाधीश कुमार यांनी व्हर्च्युअल कोर्टरूममध्ये समोसे खाताना सापडलेल्या एका वकिलाची घटना सांगितली. ते म्हणाले की, एकदा वकील आमच्यासमोर समोसे खात होते. त्याने समोसे खाण्यास आमची हरकत नाही. पण, एकच गोष्ट होती की तो आमच्यासमोर समोसे खाऊ शकत नाही कारण तो सगळ्यांना भुरळ पाडतो. एकतर त्याने सर्वांना समोसे द्यावेत नाहीतर सुनावणीच्या वेळी समोसे खाऊ नाहीत.
- न्यायाधीक्षांनी दिली ही शिक्षा?
न्यायाधीशांनी सरकारी वकील देवनानी यांना पोलीस अधिकारी पित असलेल्या कोल्ड ड्रिंक्सचे 100 कॅन बार असोसिएशनला वितरित करण्याचे निर्देश देण्यास सांगितले. न्यायाधीशांनी कठोर शब्दात सांगितले की, बार असोसिएशनमधील प्रत्येकाला कोकाकोलाचे 100 कॅन अधिकाऱ्याने वाटले नाहीत, तर आम्ही मुख्य सचिवांना त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सांगू. हे कॅन आज संध्याकाळपर्यंत वितरित झाले पाहिजेत, असेही न्यायाधीशांनी सांगितले आहे.
कोकाकोला वितरित करण्यावर वरिष्ठ अधिवक्ता भास्कर तन्ना यांनी उपाय सुचवला आहे. हा कोकाकोला जास्ती हानिकाक असेल तर त्याऐवजी लिंबू सरबत किंवा ज्युस देण्यास सांगा. यावर ज्युसचे 100 कॅन देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. तसेच हे कॅन पोहच झाल्यावर याची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेश सरकारी वकिलांना दिले आहेत. यानंतरच न्यायालयात पुढील खटल्यांची सुनावणी सुरू झाली.