ETV Bharat / bharat

लसीचा फॉर्म्युला शेअर करण्याचा निर्णय घेण्यात दिरंगाई; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम

केंद्र सरकारने अन्य लसी उत्पादकांना कोव्हॅक्सिन तयार करण्यास आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय उशिरा घेण्यात आल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. अन्य लसी उत्पादकांना कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यास केंद्र सरकारने दिरंगाई केली. कधीही न होण्यापेक्षा उशीराने होणे ठिक आहे. परंतु, निर्णय घेण्यास लागलेल्या 4 आठवड्यांच्या विलंबाने संक्रमण आणि जीवितहानीसाठी कोणाला जबाबदार धरावे, असा सवाल चिदंबरम यांनी केला.

चिदंबरम
author img

By

Published : May 15, 2021, 4:39 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. मात्र, देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून केंद्र सरकारवर विरोधीपक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. केंद्र सरकारने अन्य लसी उत्पादकांना कोव्हॅक्सिन तयार करण्यास आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय उशिरा घेण्यात आल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

अन्य लसी उत्पादकांना कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यास केंद्र सरकारने दिरंगाई केली. कधीही न होण्यापेक्षा उशीराने होणे ठिक आहे. परंतु, निर्णय घेण्यास लागलेल्या 4 आठवड्यांच्या विलंबाने संक्रमण आणि जीवितहानीसाठी कोणाला जबाबदार धरावे, असा सवाल चिदंबरम यांनी केला.

सीडब्ल्यूसीने अन्य उत्पादकांना सक्तीचे परवाने देण्याची मागणी केली होती. त्याच्या चार आठवड्यांनंतर केंद्र सरकारने अन्य उत्पादकांना कोव्हॅक्सिन तयार करण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले.

भारत बायोटेक इतर कंपन्यांना देणार लसीचा फॉर्म्युला देणार

केंद्र सरकार आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक इतर कंपन्यांना कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी आमंत्रित करण्यास तयार आहे, असे एनआयटीआय आयुक्त सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी गुरुवारी सांगितले. ज्या कंपन्या लस उत्पादनासाठी सक्षम आणि इच्छूक आहेत त्यांनी पुढे यावं असंही आवाहन पॉल यांनी केलं. देशभरातील लसीकरण केंद्रांवर कोरोना लसीच्या कमतरतेच्या अनेक बातम्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लसीचा फॉर्म्युला शेअर करण्याची मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना लसीच्या कमतरतेबाबत मुद्दा उपस्थित केला होता. केंद्र सरकारने कोरोना लसीचा फॉर्म्युला सार्वजनिक करावा, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली होती. लसीचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर अनेक कंपन्यांना लसीचे उत्पादन वाढविणे शक्य होईल, असे ते म्हणाले होते. तसेच दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे लसीचा फॉर्म्युला शेअर करण्याची मागणी केली होती.

कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी लस -

देशात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण सुरू असताना कोव्हॅक्सिनचा वापर करण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी असलेली कोरोना विरोधातील लस आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा - 'गंगेने बोलवलं, असे म्हणणाऱ्यांनीच आता माँ गंगेला रडवलं'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.