ETV Bharat / bharat

Cock reached police station: 'लेग पीस' तोडला.. मालकिणीसह कोंबड्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव.. गुन्हा दाखल

बिहारमधील बेतिया येथील पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण पोहोचले. न्याय मागण्यासाठी एक कोंबडा पोलिस ठाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. कोंबड्याची मालकीणही तिच्यासोबत होती. तिने या कोंबड्याची ही अवस्था कशी झाली ते सांगितले. आता कोंबड्याचा पाय तोडणाऱ्या शेजाऱ्यावर महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

Chicken leg broken Due to neighbor dispute
'लेग पीस' तोडला.. मालकिणीसह कोंबड्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव.. गुन्हा दाखल
author img

By

Published : Feb 24, 2023, 4:49 PM IST

मालकिणीसह कोंबड्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव..

पश्चिम चंपारण (बिहार): बेतिया पोलीस ठाण्यात चक्क एक कोंबडा उपनिरीक्षकाकडे न्याय मागण्यासाठी पोहोचला आहे. कोंबड्याची मालकीणही त्याच्यासोबत पोलिस ठाण्यात आली होती. तिने सांगितले की शेजाऱ्यांशी वाद झाला, त्यानंतर त्यांनी कोंबडा एकटा बसलेला पहिला आणि त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ल्यात त्याचा एक पाय मोडलाय. न्याय मागण्यासाठी या महिलेने कोंबडा घेऊन योगपट्टी पोलिस ठाणे गाठले. आता हा कोंबडा न्यायाच्या आशेने तुटलेला पाय घेऊन पोलिस ठाण्यात न्याय मिळण्याची वाट पाहत आहे.

शेजाऱ्यांनी तोडला 'लेग पीस' : ही घटना योगपट्टी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बलुआ प्रेगवा गावातील आहे. शेजाऱ्यांनी गौरी देवीच्या कोंबड्याचा पाय तोडला. महिलेने सांगितले की, शेजाऱ्यांसोबत बराच वेळ वाद सुरू होता. काल शेजाऱ्यांनी कोंबडा एकटा पाहून त्याचा पाय मोडला. त्यामुळेच आता कोंबड्यावरून सुरु झालेली ही 'झुंज' पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. कोंबड्याची मालकीण तिच्या कोंबड्यासह योगपट्टी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि शेजाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

दोषींना सोडणार नाही: एकीकडे कोंबड्याच्या पाय तोडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असताना दुसरीकडे बिहारची राजधानी पाटण्याच्या जवळ असलेला फातूहा जळत आहे. त्याठिकाणी कारवाईच्या नावाखाली काय झाले हे सगळ्यांना माहित आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये वादग्रस्त विधानांचा महापूर आलाय. त्यावर कारवाई होत नसल्याचे विरोधक सांगत आहेत. असे असताना ज्यावेळी एका कोंबड्याच्या पाय मोडला तेव्हा पोलीस ठाण्यातील हवालदाराने हृदय विचलित झाले. दोषींना सोडणार नसल्याचे त्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितले.

'पक्षी कायद्यांतर्गत कारवाई होणार': शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी पोलिसांना विचारले, कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. त्यानंतर पोलिस स्टेशनचे प्रमुख मनोज कुमार काही काळ गोंधळले आणि नंतर म्हणाले की, पक्षी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. कोंबड्याला न्याय मिळेल. आता असेच संवेदनशील पोलीस राहिले तरच बिहारला न्याय मिळेल आणि कायद्याचे राज्य राखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोंबडा घरी घेऊन जाऊन शिजवून खाणार : कोंबड्याच्या मालकाने सांगितले की, जेव्हा कोंबडा-कोंबडी दारात जायचे तेव्हा शेजारी त्यांना मारायचे. बकरा गेला की त्यालाही मारायचे. मुला-मुलींना मारहाण करायचे. आमच्या कोंबड्याला न्याय हवा आहे. जेव्हा महिलेला विचारण्यात आले की, पाय तुटलेल्या कोंबड्याचे काय करणार? त्याच्या पायाला आता प्लास्टर लावणार का? तर ती बाई म्हणाली, आम्ही कोंबड्याला घरी घेऊन जाऊन, आणि शिजवून खाऊ. मग लोकांनी विचारले की, गुन्हा दाखल आहे तर मग साक्ष कोण देणार? महिलेने सांगितले की, व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे, तोच साक्षीच्या वेळेस दाखवला जाईल.

हेही वाचा: Congress Plenary Session 2023: 'आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही तर, भाजप नेत्यांना का घाबरणार..', काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.