चेन्नई : शहरातील पलावक्कम ( Palavakkam ) परिसरात बेजबाबदारपणे रेसिंग मोटारसायकल ( racing motorcycle ) चालवून एका पादचाऱ्याचा बळी घेणाऱ्याला न्यायालयाने 14.42 लाखांचा दंड ठोठावला आहे. मोटार अपघात दावा ( Motor Accidents Claims Tribunal ) न्यायाधिकरणाचे मुख्य न्यायाधीश टी चंद्रशेखरन ( T Chandrasekaran Chief Judge ) यांनी नुकताच हा निर्णय दिला.
पीडितांचा 22.25 लाखांचा दावा - पीडितेच्या आई, पत्नीने 22.25 लाख रुपयांचा दावा केला होता मात्र, न्यायाधीशांनी नुकसानभरपाई म्हणून 14.42 लाखांची नुकसान भरपाईची मागणी मान्य केली. दुचाकीस्वार तरुणाकडे दुचारकीचा विमा तसेच वाहन परवाना नव्हाता. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला चांगलीच शिक्षा ठोठावली. 15 जुलै 2018 रोजी पहाटे पालवक्कम येथीलचहाच्या दुकानात जात असतांना दिनेश कुमार नावाच्या दुचाकी चालकाने मयत जोसेफला जोराची धडक दिली होती. मयत जोसेफ हा प्लंबर, फूड डिलिव्हरी एजंट होता.
तीन महिन्यात रक्कम जमा करण्याचे आदेश - भरपाईची रक्कम दुचाकी मालक ( वडील ).तसेच दुचाकी चालवणारा त्यांचा ( मुलगा ) यांनी संयुक्तपणे 7.5 टक्के व्याजासह केस दाखल केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले. दिनेश कुमारच्यानिष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे न्यायाधीशांनी निरिक्षण नोंदवले. इतर विविध प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत न्यायाधीशांनी हा दंड ठोठावला आहे.