ETV Bharat / bharat

Chemical Tanker Leaks in Surat : केमिकल टँकरच्या गळतीमुळे 6 जणांचा मृत्यू; तर 20 जणांवर उपचार सुरू - केमिकल टँकरच्या गळती दुर्घटना

सूरतमध्ये केमिकल टँकरच्या गळतीमुळे ( Chemical tanker leaks in Surat ) 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 20 हून ( 6 worker died 20 injured ) अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Chemical Tanker Leaks in Surat
केमिकल टँकर गळती
author img

By

Published : Jan 6, 2022, 9:04 AM IST

सुरत - गुजरातमधील सूरतमध्ये केमिकल टँकरच्या गळतीमुळे ( Chemical tanker leaks in Surat ) 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 20 हून ( 6 worker died 20 injured )अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरतच्या सचिन जीआयडीसी एक्स्टेंशन परिसरात केमिकल लीक झाल्यामुळे हा अपघात झाला. रसायन हवेत पसरल्यानंतर लोक बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. टँकरमधून विषारी रसायन बाहेर पडले. सर्व मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केमिकलने भरलेल्या टँकरच्या पाईपला गळती लागल्याने हा मोठा अपघात झाल्याचे विश्व प्रेम मिल्सचे उत्पादन व्यवस्थापक यांनी सांगितले. पहाटे पाचच्या सुमारास गॅस गळती झाल्याचा फोन आला. या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान 6 मजुरांचा मृत्यू झाला. इतर कामगारांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती धोक्याबाहेर असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा - Fadnavis Vs MVA Government : 'ठाकरे सरकार विद्यापीठांना युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र रचतंय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.