ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूमुळे सरकार अडचणीत आले आहे. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणखी एक नर चित्ता मृतावस्थेत आढळला. या चित्त्याचे नाव 'सूरज' असे होते. सध्या नर चित्ता सूरजचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे समोर येईल. दुसरीकडे, वनविभागाचे अधिकारी चित्तांच्या सुरक्षेबाबत सातत्याने बैठका घेत आहेत.
मृत्यूचे कारण संशयास्पद : कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या मृत्यूने वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अभयारण्यात आतापर्यंत एकूण 5 प्रौढ आणि 3 शावक चित्ते मरण पावले आहेत. मात्र हे चित्ते इतक्या लवकर का मरत आहेत, याचे कारण आत्तापर्यंत समोर आलेले नाही. याबाबत वनविभागाचे अधिकारी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. तसेच प्रत्येक चित्त्याच्या मृत्यूनंतर व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप होत असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. नुकताच 11 जुलै रोजी तेजस या चित्त्याचा मृत्यू झाला होता.
आतापर्यंत 8 बिबट्यांचा मृत्यू : तेजस चित्ता जंगलात मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मानेवर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळून आल्या आहेत. तेजसच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा चित्त्याला मिलन करताना जखम झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले होते की, मिलनादरम्यान दुसरा चित्ता आणि तेजस यांच्यात भांडण झाले होते. यामध्ये तेजस जखमी झाला होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुनोमध्ये चित्त्यांच्या सततच्या मृत्यूमुळे राज्य सरकारपासून वनविभागापर्यंतचे वरिष्ठ अधिकारी चिंतेत आहेत. कुनोमध्ये आतापर्यंत एकूण 8 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
आफ्रिकेतून 20 चित्ते आणले गेले : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून 20 चित्त्यांना आणण्यात आले आहे. यापैकी नामिबियातून मागच्या वर्षी 8 चित्ते आणण्यात आले होते. तर यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले आहेत. मात्र आत्तापर्यंत या 20 पैकी 8 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा :