ETV Bharat / bharat

UP Police : योगी पोलिसांचा कहर! कारवाईसाठी गेल्यानंतर केली मारहाण; एका मुलीचा झाला मृत्यू - Young woman killed by police in Chandauli district

उत्तर प्रदेशमधील चांदौली जिल्ह्यातील सय्यदराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पोलिसांनी कहरच केला आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी तेथील लोकांना मारहाण केली. (Chandauli Police Kill Girl In Police Raid) त्यामध्ये केलेल्या मारहाणीत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

UP पोलीस
UP पोलीस
author img

By

Published : May 2, 2022, 9:50 AM IST

Updated : May 2, 2022, 2:16 PM IST

उत्तर प्रदेश (चांदौली) - जिल्ह्यातील सय्यदराजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सीएम योगींच्या पोलिसांचा कहर समोर आला आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणीचा मृत्यू झाला. तर, दुसरी मुलगी जखमी झाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (UP Police ) त्याचवेळी संतप्त नागरिकांनी सय्यदराजा-जमानिया रस्ता रोखून धरत आंदोलन केले. (Chandauli Police In UP ) त्याचवेळी या घटनेनंतर पोलीस पूर्णपणे मागच्या पायावर आले असून तब्बल चार तासानंतर घटनास्थळी पोहोचले आहेत. इकडे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून राज्यातील योगी सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या पोलीस ठाण्याला निलंबित करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

मत्यू झालेल्या मुलीची बहिण माहिती देताना

रविवारी सायंकाळी सय्यदराजा पोलीस गुन्हेगार कन्हैया यादवला पकडण्यासाठी गावात आले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, तो घरी सापडला नाही. घरात फक्त दोन मुली होत्या. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. (Young woman killed by police in Chandauli district) यानंतर पोलिसांनी मुलींना मारहाण केली. ज्यात मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस तेथून पळून गेले आहेत.

व्हिडीओ

पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि बघता बघता शेकडो लोक तेथे जमा झाले. पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्याची मागणी करत ग्रामस्थांनी सय्यदराजा-जमानिया महामार्ग रोखून धरला. पण एका निष्पापाच्या रक्ताने माखलेल्या हाताला लोकांचा सामना करण्याची ताकद दिसली नाही. पोलीस न आल्याने लोकांचा संताप सातव्या गगनाला भिडला. यावेळी जमावाने पीआरबीच्या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. ज्यावर सपाचे सर्व नेते आणि गावकरी धरणावर बसले आणि त्यांनी डीएम, एसपी यांना घटनास्थळी बोलावण्याची मागणी केली. यानंतर डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाच्या पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर सय्यदराजा पोलीस ठाण्याचे प्रभारी उदय प्रताप सिंह यांना निलंबित केले. सोबतच गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - Raj Thackeray on loudspeaker : भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नही तर सामाजिक - राज ठाकरे

Last Updated : May 2, 2022, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.