ETV Bharat / bharat

उत्तराखंड महाप्रलय : आतापर्यंत ३२ मृतदेह आढळले; १७०हून अधिक बेपत्ता - उत्तराखंड हिमकडा दुर्घटना

बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक सामान पोहचवण्यात येत आहे. केंद्र सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तराखंडला सर्व ती मदत करण्यात येत आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Chamoli disaster
चमोली दुर्घटना
author img

By

Published : Feb 10, 2021, 6:58 AM IST

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली येथे आलेल्या आपत्तीमध्ये लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफची पथके तिसऱ्या दिवशीही बचावकार्यात जुंपली आहेत. ही पथके दिवसरात्र मेहनत करुन बोगद्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तसेच, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे.केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले, की या दुर्घटनेत एकूण २०६ लोक बेपत्ता झाले होते. यांपैकी ३२ लोकांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले असून, अजूनही १७०हून अधिक लोकांचा शोध सुरू आहे.

उत्तराखंडमधील मदतकार्यावर केंद्राची २४ तास नजर - अमित शाह

बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक सामान पोहचवण्यात येत आहे. केंद्र सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तराखंडला सर्व ती मदत करण्यात येत आहे. आयटीबीपीने घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून सुरक्षा दलाची विविध पथके दाखल झाली आहेत. एनडीआरएफच्या ५ तुकड्या, लष्कराच्या इंजिनियरिंग टीमसह ९ तुकड्या, नौदलाचे पथकही मदतकार्यात व्यस्त आहेत.

बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी चिखल काढण्याचे काम सुरू आहे. शसस्त्र सीमा दलाची एक टीमही घटनास्थळी पोहचली आहे. राष्ट्रीय आणीबाणी व्यवस्थापन पथकाचीही बैठक झाली. पाच हेलिकॉप्टर मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. पुराच्या लोंढ्यामुळे तुटलेल्या ५ पुलांचे कामही सुरू करण्यात आले आहे, असे अमित शाह म्हणाले.

तपोवनमधील बोगद्यात अजूनही ३५ लोक अडकलेले..

तपोवन भागामध्ये एका बोगद्यात काही कामगार अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बोगद्यातून १६ लोकांना बाहेर काढण्यात आले असून, अजूनही ३५ लोक आतमध्ये अडकलेले आहेत. या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्यामुळे आत जाण्यास अडचण येत आहे. मात्र, तरीही बचाव पथकांनी आपले काम सुरू ठेवले आहे.

सध्या या बोगद्यामध्ये मोठ्या मशीनींव्यतिरिक्त एक स्कॉर्पिओ गाडी, एक मोठा लोडर, एक जेसीबी आणि आणखी दोन-तीन गाड्याही उपलब्ध आहेत. या बचावकार्यचे मॉनिटरिंग करणारे दोन अधिकारीदेखील बोगद्यामध्ये आहेत, अशी माहिती विद्या दत्त यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले, की बोगद्यामध्ये चिखलाच्या पुढेही पाणी असू शकते, त्यामुळे काळजीपूर्वक हा चिखल बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सध्या आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्यास आम्ही प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह म्हणाले आहेत. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. दरम्यान, या नसर्गिक आपत्तीचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. डीआरडीओ आणि भारत सरकारचे इतर वैज्ञानिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इस्रोकडून डोंगरभागाचे छायाचित्रे मागवण्यात आली असून त्यांचा अभ्यास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.