ETV Bharat / bharat

चमोली हिमस्खलन : तपोवन बोगद्यातून आणखी एक मृतदेह मिळाला - चमोली दुर्घटना

जोशीमठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुमित बदोनी यांनी सांगितले, की मृतदेहाचे शवविच्छेदन पार पडले आहे. या दुर्घटनेत एकूण २०४ लोक बेपत्ता झाले होते. त्यांपैकी ८२ लोकांचे मृतदेह आढलून आले आहेत. तसेच ३५ मानवी अवयव मिळून आले आहेत. अजूनही तब्बल १२१ जण बेपत्ता आहेत. तसेच आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडले आहेत, त्यांपैकी ४९ जणांची ओळख पटली आहे.

Chamoli disaster: One more body recovered from Tapovan tunnel
चमोली हिमस्खलन : तपोवन बोगद्यातून आणखी एक मृतदेह मिळाला
author img

By

Published : May 10, 2021, 6:56 AM IST

देहराडून : उत्तराखंडमध्ये सात फेब्रुवारीला हिमस्खलन झाल्यामुळे भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध अजूनही सुरू आहे. रविवारी तपोवन बोगद्यातून एनडीआरएफच्या पथकाने या दुर्घटनेतील आणखी एका बळीचा मृतदेह बाहेर काढला. लालकोट गावात राहणाऱ्या धिरेंद्र यांचा मुलगा हर्षा याचा हा मृतदेह असल्याचे सांगण्यात येत आहे.

जोशीमठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुमित बदोनी यांनी सांगितले, की मृतदेहाचे शवविच्छेदन पार पडले आहे. या दुर्घटनेत एकूण २०४ लोक बेपत्ता झाले होते. त्यांपैकी ८२ लोकांचे मृतदेह आढलून आले आहेत. तसेच ३५ मानवी अवयव मिळून आले आहेत. अजूनही तब्बल १२१ जण बेपत्ता आहेत. तसेच आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडले आहेत, त्यांपैकी ४९ जणांची ओळख पटली आहे.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात सात फेब्रुवारीला एक महाकाय हिमकडा कोसळला होता. कोसळलेल्या हिमकड्यामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा नदीला प्रलयंकारी महापूर आला होता. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे नदीतील पाणीपातळी वाढून पाण्याच्या प्रवाहाची गतीही कैकपटीने वाढली. त्यामुळे नदी पात्राबाहेरून ओसंडून वाहू लागली. अचानकच निर्माण झालेल्या या अभूतपूर्व स्थितीमुळे नदीकिनाऱ्याजवळील परिसरात मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा : 'हिमकडा कोसळून नव्हे तर ताजा बर्फसाठा कोसळल्यानं दुर्घटना घडली'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.