नवी दिल्ली: आम आदमी पार्टी सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा facilities available to Satyendar Jain पुरवल्या जात असल्याची माहिती आहे. या वृत्तावर केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून Chief Secretary of Delhi Government सविस्तर अहवाल मागवला. रिपोर्टनुसार, विशेष खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, जैन यांना जेलमध्ये मसाजची सुविधा देखील दिली जाते.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या जैन कोणत्याही योग्य परवानगीशिवाय तुरुंगात अनेक अनोळखी लोकांना भेटत असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने जैन यांना दिलेल्या अशा विशेष वर्तनाची सर्व कागदपत्रे आणि फुटेज आधीच गृह मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत. विशेष म्हणजे जैन यांना अशी वागणूक दिल्याची माहिती ईडीने सोमवारी दिल्ली न्यायालयाला दिली होती.
यापूर्वी एप्रिलमध्ये ईडीने जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सीबीआयने जैन आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार मनोज तिवारी यांनीही तिहार तुरुंग प्रशासनाने जैन यांना विशेष सुविधा दिल्याचा आरोप केला आहे.