नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 12 वाजता जाहीर झाले आहेत. हा निकाल विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर कळू शकणार आहे.
कोरोना महामारीमुळे सीबीएसईने दहावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. सीबीएसईने दहावीच्या परीक्षेचे निकाल हे मूल्यांकन काढून निश्चित केले आहेत. मुल्यांकनावर आधारित दहावीच्या परीक्षेचे निकाल विद्यार्थ्यांना www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in किंवा www.cbse.gov.in या वेबसाईटवर पाहता येतात. परीक्षेचे निकाल डिजी लॉकरलाही अपलोड करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा- पेगासस प्रकरण : नितीश कुमारांच्या मागणीनंतर आतातरी मोदी सरकारने चौकशी करावी - संजय राऊत
कोरोनामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनने सर्वांना व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाईन शिक्षणाकडे वळण्यास भाग पाडले आहे. मात्र, भारत अजूनही या स्वप्नापासून दुर असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्ड तयार नसल्याचे बोर्डाचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी नुकतेच म्हटले आहे.
हेही वाचा- संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट; नेमकी कशावर चर्चा झाली?