ETV Bharat / bharat

CBSC 12th Result : सीबीएससीच्या 12वीच्या निकालाच्या संदर्भातील 'ती' पोस्टी खोटी; सीबीएससीच्या परीक्षा नियंत्रकांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Jan 25, 2022, 7:02 PM IST

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE Result 2022 ) इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात एक परिपत्रक सोशल मीडियावर ( CBSC 12th Exam Viral Post ) व्हायरल होत आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारतने' सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज ( Dr. Sanmay Bharadwaj Spoke With ETV Bharat ) यांना विचारले असता, ते म्हणाले की व्हायरल होत असलेले परिपत्रक खोटे आहे.

CBSC
CBSC

नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE Result 2022 ) इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात एक परिपत्रक सोशल मीडियावर ( CBSC 12th Exam Viral Post ) व्हायरल होत आहे. 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 जानेवारीला दुपारी जाहीर होईल, असे व्हायरल होत असलेल्या परिपत्रकात लिहिले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारतने' सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज ( Dr. Sanmay Bharadwaj Spoke With ETV Bharat ) यांना विचारले असता, ते म्हणाले की व्हायरल होत असलेले परिपत्रक खोटे आहे. बोर्डाने आतापर्यंत पहिल्या टर्म परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही किंवा कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीखही जारी केलेली नाही.

काय लिहिले आहे व्हायरल पोस्टमध्ये-

सीबीएससीच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 जानेवारीला 2 वाजता आहे. दरम्यान, निकाल पाहण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याचे व्हायरल होत असलेल्या परिपत्रकात लिहिले आहे. केंद्राकडून सर्व विद्यार्थ्यांना एक युनिक युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे. या व्हायरल होत असलेल्या परिपत्रकाबाबत सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज म्हणाले की, परिपत्रक पूर्णपणे बनावट आहे. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी CBSE ने 10वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पहिल्या टर्मची परीक्षा घेण्यात आली. बोर्डाने आतापर्यंत पहिल्या टर्म परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही किंवा कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीखही जारी केलेली नाही.

हेही वाचा- Shilpa Shetty Kissing Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची 'किस' प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.