पाटणा : आज सकाळी राजदचे खजिनदार आणि बिस्कोमनचे अध्यक्ष, तसेच विधान परिषदेचे आमदार सुनील कुमार सिंह आणि राज्यसभा खासदार अशफाक करीम, आरजेडीचे खासदार फयद अहमद, माजी आमदार सुबोध राय आणि माजी आमदार अबू दुजाना यांच्या बिहारमधील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीबीआयने नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या प्रकरणाबाबत ही कारवाई केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मात्र ही राजकीय सुडाची कारवाई असल्याचे सांगत केंद्रातील सत्ताधारी भाजपवर आरोप केला आहे.
नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात कारवाई सीबीआयने सुनील सिंह यांच्या पाटणा येथील निवासस्थानावर तसेच सारण जिल्ह्यातील नया गावात असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानांवर कारवाई केली आहे. सीबीआय आरजेडीचे सुनील कुमार सिंग आणि राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या निवासस्थानांवर छापे टाकत आहे. केंद्रीय एजन्सीने ही कारवाई जमिनीऐवजी नोकरी घोटाळ्यात केली आहे.
काय आहे रेल्वे भरती घोटाळा वास्तविक, रेल्वे भरती घोटाळा देखील 2004 ते 2009 या वर्षातील आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी मिळविण्यासाठी जमीन, भूखंड घेतले. या प्रकरणी 18 मे रोजी सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांच्यासह इतरांविरोधात एफआयआर नोंदवला होता. मे 2022 मध्ये एकाच वेळी 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. रेल्वेतील ग्रुप डी मधील नोकरीच्या बदल्यात पाटण्यातील प्रमुख मालमत्ता लालूंच्या कुटुंबीयांना भेट दिल्याचा आरोप आहे.
सुनील कुमार सिंह यांची गणना आरजेडीच्या मोठ्या नेत्यांमध्ये केली जाते आणि ते पक्षाचे कोषाध्यक्ष देखील आहेत. सुनील कुमार सिंह यांची देखील लालू कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये गणना केली जाते. सीबीआयने सुनील सिंग राहत असलेल्या राजधानीतील जेडी महिला महाविद्यालयाजवळील अपार्टमेंटमध्ये हा छापा टाकला आहे.
हेही वाचा तुरुंगातून बाहेर येताच लालू 'अॅक्शन मोड'वर; आज घेणार राजद नेत्यांची व्हर्चुअल बैठक