चेन्नई : 17 मे रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने ( सीबीआय ) कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी छापे टाकले होते, चिनी लोकांसाठी व्हिसा खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा सीबाआयने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. ( CBI Raid on Karti Chidambaram House )
सीबीआयचे सात अधिकारी दाखल - त्यावेळी, चेन्नईच्या पायक्रॉफ्ट्स रोड, नुंगमबक्कम येथील कार्ती चिदंबरमचे घर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना उघडता आले नव्हते. कारण चावी त्यांच्याकडे नव्हती. आता सीबीआयला लंडनमधील कार्ती चिदंबरम यांच्याकडून चावी मिळाली असून त्यांनी आज (९ जुलै) घर उघडले आहे. आज दुपारी 2.20 वाजता सुरू त्यांनी या घरावर छापा टाकला. या छाप्यात सीबीआयचे सात अधिकारी सहभागी होते.
-
Tamil Nadu | CBI officials raid Congress leader Karti Chidambaram's residence in Chennai pic.twitter.com/SlVxVpb2pu
— ANI (@ANI) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu | CBI officials raid Congress leader Karti Chidambaram's residence in Chennai pic.twitter.com/SlVxVpb2pu
— ANI (@ANI) July 9, 2022Tamil Nadu | CBI officials raid Congress leader Karti Chidambaram's residence in Chennai pic.twitter.com/SlVxVpb2pu
— ANI (@ANI) July 9, 2022
17 मे रोजी एकाला केली होती अटक - सीबीआयने काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या घरी तसेच कार्यालयात छापे 17 मे रोजी टाकले होते. एका चालू प्रकरणाच्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना ( CBI Raided Karti Chidambaram House Office ) सांगितले. या प्रकरणी आता एस भास्कर रामण यांना अटक करण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांचे ते जवळचे सहकारी आहेत.