बंगळुरू : भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी धारवाडमधून काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
२०१६चे आहे प्रकरण..
भाजपचे तालुका पंचायत सदस्य योगेश गौडा यांची १५ जून २०१६ला त्यांच्या व्यायामशाळेबाहेर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी धारवाडमधील सहा जणांविरोधात चार्जशीट दाखल केली होती. २०१९मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
आतापर्यंत आठ जणांना अटक..
सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत आठ जणांना याप्रकरणी अटक केली आहे. यामधील सातजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर एक जामीनावर बाहेर आहे.
हेही वाचा : गोवा आणि कर्नाटक दरम्यान महामार्ग विस्ताराला काँग्रेसचा विरोध