ETV Bharat / bharat

सॅटेलाइट फोन वापरल्याप्रकरणी जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

author img

By

Published : Oct 27, 2022, 5:10 PM IST

मिळालेल्या माहितीनुसार, फर्गस इयान मॅक्लिओड सॅटेलाइट फोनसह भारत-चीन सीमेवर ( oil company officer jailed ) हिंडत होते. हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि शीखांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिबजवळ आहे. हे ठिकाण चमोली जिल्ह्यांतर्गत येते आणि चीनसोबत सामायिक केलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेला ( using satellite phone at chamoli ) लागून आहे

सॅटेलाइट फोन
सॅटेलाइट फोन

डेहराडून : भारतात बंदी असलेला सॅटेलाईट फोन वापरल्याप्रकरणी सौदी अरेबियातील एका मोठ्या तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यामुळे चमोली जिल्ह्यातील पुरसादी कारागृहात सात दिवस या अधिकाऱ्याला कैद करण्यात आले. कंपनीचे ब्रिटीश एक्झिक्युटिव्ह फर्गस इयान मॅक्लिओड ( Ian Macleod Saudi Aramco ) यांना चमोली पोलिसांनी प्रतिबंधित सॅटेलाइट फोन वापरल्याप्रकरणी अटक केली. फर्गस इयान हा जगप्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये सुट्टी घालवण्यासाठी आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फर्गस इयान मॅक्लिओड सॅटेलाइट फोनसह भारत-चीन सीमेवर ( oil company officer jailed ) हिंडत होते. हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि शीखांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिबजवळ आहे. हे ठिकाण चमोली जिल्ह्यांतर्गत येते आणि चीनसोबत सामायिक केलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेला ( using satellite phone at chamoli ) लागून आहे. यामुळे हा संपूर्ण परिसर अतिसंवेदनशील मानला जातो. सॅटेलाईट फोन सापडल्यानंतर पोलिसांनी फर्गस इयान मॅक्लिओडला अटक केली.

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

सॅटेलाइट फोनही जप्त चमोलीच्या पोलिस उपअधीक्षक नताशा सिंह यांनी सांगितले की, 10 जुलै रोजी संध्याकाळी एक परदेशी नागरिक व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी गेला होता. त्याच्याकडून प्रतिबंधित सॅटेलाइट फोन वापरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून 11 जुलै रोजी घांगरिया, पुलना आणि गोविंदघाट येथे आरोपींचा शोध घेण्यात आला, त्यानंतर 11 जुलै रोजी एक विदेशी नागरिक फर्गस इयान मॅक्लिओड याला पुलनाजवळील गोविंदघाट पोलिस स्टेशनने व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक सॅटेलाइट फोनही जप्त केला आहे.

आरोपीची जामिनावर सुटका आरोपीविरुद्ध गोविंदघाट पोलीस ठाण्यात कलम 4/20 भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 आणि कलम 3/6 भारतीय वायरलेस टेलिग्राफ मेकॅनिक्स कायदा 1933 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशा स्थितीत आरोपीला 12 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, नंतर त्याला १००० रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.