हैदराबाद : पाकिस्तानातील जनता महागाईचा सामना करत आहे. ही महागाई केवळ खाद्यपदार्थांवरच नाही, तर इतर सर्वच वस्तूंवरही दिसून येत आहे. अलीकडेच, पाकिस्तान सरकारने कारसाठी सामान्य विक्री कर (GST) वाढवला आहे. सरकारने 1400cc किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या गाड्यांवरील जनरल सेल्स टॅक्स (GST) 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, त्यानंतर येथे कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानमधील रखडलेल्या कर्ज कार्यक्रमाला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जरी पाकिस्तानमध्ये अनेक ब्रँडच्या कार विकल्या जातात, परंतु काही कार ब्रँड भारतात तसेच पाकिस्तानमध्ये विकल्या जातात. आज आम्ही भारतातील या कार ब्रँडच्या किमतीची पाकिस्तानमधील किंमतीशी तुलना करणार आहोत.
मारुती सुझुकी अल्टो : मारुती सुझुकी भारतात आपली सर्वात स्वस्त कार Maruti Suzuki Alto 800 ची विक्री 3.53 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत करते, तर त्यात 796cc इंजिन आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये विकली जाणारी अल्टो फक्त सुझुकी अल्टोच्या नावावर विकली जाते, ज्यामध्ये 660cc इंजिन उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये या कारची किंमत 21.44 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे 6.28 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर : मारुती सुझुकी वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय कार आहे, जी मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप आवडते. भारतात, 2019 मध्ये याला फेसलिफ्ट अपडेट प्राप्त झाले होते. आता या कारची किंमक 5.52 लाख (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, ही कार पाकिस्तानमध्ये सुझुकी वॅगनआर नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार पाकिस्तानात 30.62 लाख रुपयाला विकली जात आहे. तीची किंमत भारतीय चलनात सुमारे 8.97 लाख रुपये आहे.
होंडा सिटी सेडान : भारतातील प्रीमियम सेडानबद्दल बोलायचे झाल्यास, होंडा सिटीचे स्वतःचे स्थान आहे. ही कार अनेक वर्षांपासून भारतात उपलब्ध आहे. देशात हा ब्रॅंड खुप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानमध्ये होंडा सिटीचीही विक्री होते. सेडान पाकिस्तानमध्ये PKR 47.79 लाखाच्या सुरुवातीच्या किमतीत विकली जात आहे, जी भारतात अंदाजे 14 लाख रुपये आहे. त्याच वेळी, ही कार भारतात 11.52 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीत विकली जात आहे.
किआ कार्निवल : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia आपली लक्झरी MPV Kia Carnival पाकिस्तान तसेच भारतात विकली जाते. भारतात किआ कार्निव्हल 30.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत विकले जात असताना, पाकिस्तानमध्ये ही कार 1.56 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकली जात आहे, जी भारतीय चलनात सुमारे 45.71 रुपये आहे.
टोयोटा फॉर्च्यूनर : टोयोटा फॉर्च्युनर ऑफ-रोडिंग तसेच लक्झरी शौकिनांची पहिली पसंती आहे. भारताप्रमाणेच फॉर्च्युनर आणि फॉर्च्युनर लिजेंडर या दोन्ही गाड्या पाकिस्तानमध्ये विकल्या जातत. भारतात फॉर्च्युनरची किंमत रु. 32.59 लाख आणि फॉर्च्युनर लिजेंडरची किंमत रु. 42.82 लाख पासून सुरू होते, तर पाकिस्तानमध्ये फॉर्च्युनरची किंमत रु. 1.58 कोटी (रु. 46.30 लाख) पासून सुरू होते, तर फॉर्च्युनर लिजेंडरची किंमत रु. 2.01 कोटी पासून सुरू होते. (58.99 लाख रुपये) विलकी जात आहे.