ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये अमित शाह यांची कॅप्टन भेट घेणार का ? ट्विट करून अमरिंदर यांनी दिले स्पष्टीकरण - punjab assembly election 2022

पंजाबमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिंदर सिंग हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदावरून हटविल्यानंतर त्यांनी नाराजी बोलून दाखविली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते काँग्रेसचे हायकमांड नव्हे तर भाजपच्या अध्यक्षांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे.

अमरिंदर सिंग
अमरिंदर सिंग
author img

By

Published : Sep 28, 2021, 3:17 PM IST

Updated : Sep 28, 2021, 6:02 PM IST

नवी दिल्ली- पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजकीय हालचालींबाबत विविध अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. अशातच अमरिंदर सिंग हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा खासगी दौरा असल्याचे अमरिंदर सिंग यांच्या माध्यम सल्लागारांनी म्हटले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विविध चर्चा सुरू असताना त्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी स्पष्टीकरण केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत खूप काही बोलले जात आहे. हा दौरा खासगी आहे. या दौऱ्यात ते काही मित्रांना भेटणार आहे. नवीन मुख्यमंत्र्यांसाठी ते कपूरथलामधील घर रिकामे करणार आहेत. कोणत्याही अनावश्यक अंदाजांची गरज नाही.

  • Too much being read into @capt_amarinder’s visit to Delhi. He’s on a personal visit, during which he’ll meet some friends and also vacate Kapurthala house for the new CM. No need for any unnecessary speculation. pic.twitter.com/CFVCrvBQ0i

    — Raveen Thukral (@RT_Media_Capt) September 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबरोबर टोकाचे मतभेद झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबरला संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा दिला होता. मुख्यंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा अमरिंदर सिंग म्हणाले होते, की स्वत:ला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. त्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्री पद घेतले काढून...

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. अमरिंदर सिंग हे कोणता निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. अमरिंदर सिंग हे काँग्रेस सोडणार का? काँग्रेस सोडल्यानंतर पुढील पाऊल कोणते उचलणार? पंजाबमध्ये पुढील वर्षात 2021 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना हटवून पंजाबमध्ये प्रथमच मागासवर्गीय घटकामधील नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.

हेही वाचा-सिद्धूंना मुख्यमंत्री पदापासून रोखण्याकरिता कोणताही त्याग करण्यास तयार- अमरिंदर सिंग

अमरिंदर सिंग कोणता घेणार निर्णय?

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली होती. मात्र, काँग्रेस सोडणार की नाही, कोणत्या पक्षात जाणार याची माहिती अमरिंदर सिंग यांनी जाहीर केलेली नाही. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. ते दुसऱ्या पक्षाची घोषणा करू शकतात. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण, त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.

हेही वाचा-'भारत बंद'ला मिळालेला प्रचंड पाठिंबा हा मोदी सरकारविरोधातील रोष, 'ईटीव्ही भारत'ची डॉ. ढवळे यांच्याशी खास बातचीत

पंजाबमध्ये पहिल्यांदाच भाजप अकाली दलापासून वेगळे होत स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविणार आहे. अद्याप, भाजपजवळ मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ उमेदवार नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या बडा नेत्या भाजपमध्ये प्रवेश झाल्यास पक्षाला पंजाबमधील आगामी निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो. आसाममधील निवडणुकीत भाजपने असाच अनुभव घेतलेला आहे.

Last Updated : Sep 28, 2021, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.