ओटावा : Canada Travel Advisory India : कॅनडाच्या सरकारनं भारतातील नागरिकांसाठी प्रवासाबाबत एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. भारतात राहणाऱ्या कॅनडातील नागरिकांना सतर्क राहण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आली असल्याचं कॅनडा सरकारनं स्पष्ट केलंय.
काय आहे प्रकरण? : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडात तणाव वाढलाय. खलिस्तानीवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागं भारताचा हात असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. भारतानं हे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडानं लावलेले हे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. निज्जरला भारतानं दहशतवादी घोषित केलं होतं, असं भारतानं म्हटलं आहे. त्यामुळं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कॅनडातील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी : भारतानं मागील आठवड्यात कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायझरी जारी केली होती. कॅनडामध्ये राहणारे भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि कॅनडाला जाण्याचा प्लॅन करत असलेल्या प्रवाशांसाठी एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली होती. यात सावध राहण्याचा सल्ला कॅनडामधील भारतीयांना देण्यात आला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली होती. कॅनडातील ज्या भागात भारतविरोधी कारवाया होत आहेत अशा ठिकाणी आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला भारतीय नागरिकांना आणि कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
वाद चिघळण्याची शक्यता : कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर कॅनडानं भारतीय दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले होते. तर लगेच प्रत्युत्तर देत भारतानं कॅनडा दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टीक करत पाच दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.
हेही वाचा -