जयपूर - राजस्थानमध्ये शनिवारी मोठी उलथापालथ झाली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ASHOK GEHLOT ) यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. गेहलोत सरकारच्या मंत्रिमंडळाची रविवारी पुनर्रचना (Rajasthan Cabinet Reshuffle) होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मंत्रिमंडळात 11 कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.
तत्पूर्वी शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. सीएम गेहलोत यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन राजीनामे सादर केले. आज काँग्रेस मुख्यालयात 2 वाजता आमदारांची बैठक आहे. यामध्ये नव्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. 11 कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री आज दुपारी 4 वाजता शपथ घेऊ शकतात, असे म्हटलं जात आहे.
गेहलोत मंत्रिमंडळात 8 नवीन मंत्री असतील असे सांगण्यात येत आहे. तीन राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. 4 नवीन राज्यमंत्री असतील. राजस्थानमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
हे कॅबिनेट मंत्री असतील -
हेमाराम चौधरी, महेंद्रजितसिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंग, रमेश मीना, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंद राम मेघवाल, शकुंतला रावत.
हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन प्रस्ताव ठेवण्यात आले होते. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना एका ठरावाद्वारे राजस्थानमध्ये मंत्री बनवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दुसऱ्या ठरावात काँग्रेसच्या अधिवेशनानुसार सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. जाहिदा, ब्रजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीणा हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रविवारी काँग्रेस प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, अजय माकन आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर 15 नावांवर शिक्कामोर्तब झाले. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवन गाठून राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा, महसूल मंत्री हरीश चौधरी, वैद्यकीय मंत्री डॉ रघु शर्मा आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांचे राजीनामे तत्काळ स्वीकारले. या तिन्ही नेत्यांकडे संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.