भुवनेश्वर - ओडिशात राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे ( Cabinet reshuffle in Odisha ) दिले आहेत. ओडिशा विधानसभा अध्यक्ष सूर्य नारायण पात्रा यांनीही आपल्या पदाचा ( Odisha Speaker Surya Patra resigned ) राजीनामा दिला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी सकाळी 11.45 वाजता होणार ( Odisha Cabinet resignation ) आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा देण्याची ओडिशातील ही पहिलीच वेळ आहे. 2024 च्या निवडणुकीची तयारी पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तातडीने राजीनामा देण्याची सूचना-सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्र्यांना तातडीने राजीनामे देण्याच्या ( Chief Minister Naveen Patnaiks Cabinet ) सूचना दिल्या आहेत. त्यानंतर, सभापती सूर्य नारायण पात्रासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा ( Speaker Surjya Narayan Patra ) दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल गणेशीलाल राजभवन येथे रविवारी सकाळी ११.४५ वाजता नवीन मंत्र्यांना शपथ देणार आहेत. मात्र, शपथविधी समारंभात नवीन कॅबिनेट मंत्र्यांना खाते सोपवण्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जूनपासून सुरू-मुख्यमंत्री नवीन पटनायक 20 जूनपासून विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ सोडण्यापूर्वी त्यांना मंत्रिमंडळात सुधारणा करायची असल्याचे मानले जात आहे. पटनायक हे रोम आणि दुबईला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार आहे. बीजेडी सरकारने 29 मे रोजी आपल्या पाचव्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली आहेत.
हेही वाचा-Boiler Explosion in Hapur : उत्तर प्रदेशातील हापूर येथे रासायनिक कारखान्यात स्फोट, 6 जणांचा मृत्यू