ऊधमपूर - जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये एक बस आज सकाळी खोल दरीत ( Bus falls into valley ) कोसळली. बर्मीन भागातील खोल दरीत ही बस कोसळून 15 जण गंभीर जखमी झाले ( 15 People Seriously Injured ) आहेत. जखमींमध्ये 12 विद्यार्थी आहेत. अपघातस्थळी मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
जखमींमध्ये 12 विद्यार्थी - जखमी 15 जणांपैकी 12 जण विद्यार्थी आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पबरमीन येथून ही बस उधमपूरला चालली होती. या मार्गातच ही बस दुर्घटनाग्रस्त झाली. उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. रस्त्याच्या अवस्था अत्यंत खराब असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - Aurangabad flood : दुदैवी....! पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, परिसरात शोककळा