डीडवाना (राजस्थान) : राजस्थानच्या डीडवाना जिल्ह्यातील बांठडी गावाजवळ शनिवारी संध्याकाळी भीषण रस्ता अपघात झाला. बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना राजधानी जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व मृत आणि जखमी सीकर जिल्ह्यातील रहिवासी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीडवाना-कुचामन जिल्ह्याच्या बांठडी गावातील तित्री चौकात हा अपघात झाला. कारमधील सर्व लोक नागौर येथे एका लग्नात सहभागी होऊन सीकर येथे परतत होते. या दरम्यान बांठडी गावातील तित्री चौकाजवळ हा अपघात झाला. सर्व मृत आणि जखमी सीकर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना शक्य तेवढी मदत करू - जिल्हाधिकारी : या अपघाताची माहिती मिळताच डीडवानाचे आमदार चेतन दुडी, जिल्हाधिकारी सीताराम जाट यांनी डीडवाना येथील बांगर हॉस्पिटलमध्ये धाव घेत जखमींची भेट घेतली. 'मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल', असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 'मृतांच्या नातेवाईकांना जी काही मदत करता येईल, ती मदत आम्ही करू', असे जिल्हाधिकारी म्हणाले.
धडकेत कारचा चक्काचूर झाला : प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला. धडक झाल्यानंतर कारने सुमारे ३ ते ४ वेळा पलटी मारली आणि ती २० फूट दूर अंतरावर जाऊन पडली. या अपघातात कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला, तिथे आजूबाजूला काही घरे आणि दुकाने आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि रुग्णवाहिकेला तातडीने बोलवण्यात आले.
राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला : विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनीही या घटनेवर ट्विट केले. 'बांठडी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. सर्व मृतांना आदरांजली अर्पण करून, मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो', असे ते म्हणाले.
-
नागौर के बांठडी चौराहे पर हुए भीषण सड़क हादसे में कई लोगों के काल कवलित होने का दु:खद समाचार प्राप्त हुआ है। हादसे में जान गंवाने वाले लोगों के परिजनों के प्रति गहरी शोक संवेदनाएं व्यक्त करता हूं। ईश्वर दिवंगत आत्माओं को शांति दें और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करें।…
— Rajendra Rathore (@Rajendra4BJP) August 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नागौर के बांठडी चौराहे पर हुए भीषण सड़क हादसे में कई लोगों के काल कवलित होने का दु:खद समाचार प्राप्त हुआ है। हादसे में जान गंवाने वाले लोगों के परिजनों के प्रति गहरी शोक संवेदनाएं व्यक्त करता हूं। ईश्वर दिवंगत आत्माओं को शांति दें और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करें।…
— Rajendra Rathore (@Rajendra4BJP) August 12, 2023नागौर के बांठडी चौराहे पर हुए भीषण सड़क हादसे में कई लोगों के काल कवलित होने का दु:खद समाचार प्राप्त हुआ है। हादसे में जान गंवाने वाले लोगों के परिजनों के प्रति गहरी शोक संवेदनाएं व्यक्त करता हूं। ईश्वर दिवंगत आत्माओं को शांति दें और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करें।…
— Rajendra Rathore (@Rajendra4BJP) August 12, 2023
-
नागौर के बांठडी चौराहे पर हुए घातक सड़क हादसे में कई लोगों के कालकवलित होने का दुखद समाचार प्राप्त हुआ।
— C. P. Joshi (@cpjoshiBJP) August 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सभी मृतकों को सादर श्रद्धांजलि अर्पित करते हुए घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना तथा मृतकों के परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं। pic.twitter.com/G0yyOb1JzI
">नागौर के बांठडी चौराहे पर हुए घातक सड़क हादसे में कई लोगों के कालकवलित होने का दुखद समाचार प्राप्त हुआ।
— C. P. Joshi (@cpjoshiBJP) August 12, 2023
सभी मृतकों को सादर श्रद्धांजलि अर्पित करते हुए घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना तथा मृतकों के परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं। pic.twitter.com/G0yyOb1JzIनागौर के बांठडी चौराहे पर हुए घातक सड़क हादसे में कई लोगों के कालकवलित होने का दुखद समाचार प्राप्त हुआ।
— C. P. Joshi (@cpjoshiBJP) August 12, 2023
सभी मृतकों को सादर श्रद्धांजलि अर्पित करते हुए घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना तथा मृतकों के परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं। pic.twitter.com/G0yyOb1JzI
हेही वाचा :