बुरहानपूर : मध्यप्रदेशातील सुंदरदेव गावातील मजूर कामासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गेले होते. तीथे काम संपल्याने ते त्यांच्या मूळ गावी पिकअप वाहनाने जात होते. त्यावेळी धारणी खंडवा इंदोर या आंतरराज्यीय महामार्गावर देडतलाई शेखपूरा जवळ तापी नदीच्या पुलाजवळ उसाचा ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक झाली. त्यामध्ये सहा मजुरांचा मृत्यू झाला. मजूर पार्वती रामसिंग दिनकर (वय 32 वर्ष) नंदिनी रामसिंग दिनकर (वय 12 वर्ष) दुर्गा कालू तंडीलकर (वय 14 वर्ष) रमेश मंगल (वय 35) जांमवती रमेश (वय 32 वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. तर बसंती श्रीराम (वय 45 वर्ष) गणेश रामचंद्र (वय 10 वर्ष) दारासिंग श्रीराम (वय 7वर्ष) रविंद्र रमेश मुन्नी बाई रामचंद्र रामसिंग मोतीलाल कौशल्या श्रीकेश जगणं कमल चंदबाई नांणकराम सर्व राहणार सुंदरदेव मध्यप्रदेश येथील असून हे गंभीर जखमी झाले आहेत.
'या' घटनेत 5 जणांचा मृत्यू : जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या देठतलाईजवळ महामार्गावर उसाने भरलेली पिकअप आणि ट्रक यांच्यात थेट धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप महाराष्ट्रातील अकोट येथून खंडव्याकडे जात होती. ही घटना अमरावती-खडवा महामार्गावरील देठतलाई गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेत पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत आणि जखमी हे खांडवाचे सांगत आहेत : सर्व मृत आणि जखमी हे खांडवा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर पिकअपमधून खाली पडलेले वाहनातील प्रवासी रडून मदतीची याचना करताना दिसत होते.
हेही वाचा : Reaction On Budget : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच प्रतिक्रियांचा पाऊस! वाचा कोण काय म्हणाले