ETV Bharat / bharat

Delhi Building Collapsed: ..अन् क्षणात पत्त्याप्रमाणे कोसळली पाच मजली इमारत, दिल्लीत मदत व बचावकार्य सुरु..

ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात पाच मजली इमारत अचानक कोसळली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. यामध्ये काही कुटुंबे अडकल्याचीही माहिती आहे.

BUILDING COLLAPSE AT BHAJANPURA IN DELHI RELIEF AND RESCUE WORK GOING ON
..अन् क्षणात पत्त्याप्रमाणे कोसळली पाच मजली इमारत, दिल्लीत मदत व बचावकार्य सुरु..
author img

By

Published : Mar 8, 2023, 5:56 PM IST

..अन् क्षणात पत्त्याप्रमाणे दिल्लीत कोसळली पाच मजली इमारत

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात पाच मजली इमारत कोसळली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भजनपुरा भागातील विजय पार्क मेन रोडवर इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

ढिगारा हटवण्याचे काम सुरु: प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मौजपूर विजय पार्क गल्ली क्रमांक 24 मधील आहे. सध्या अग्निशमन दल, पोलीस, दिल्ली महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये इमारत कोसळल्याची घटना कैद करण्यात आली आहे. इमारत हळूहळू जमीनदोस्त होत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आजूबाजूच्या लोकांना इमारत कोसळण्याची भीती वाटल्याने त्यांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला.

दोन ते तीन कुटुंबे अडकल्याची शक्यता: त्याचबरोबर या इमारतीत दोन ते तीन कुटुंबे अडकण्याची शक्यता आहे. त्यात दबलेल्या लोकांचा बचाव कर्मचारी शोध घेत आहेत. किती कुटुंब आत अडकले आहेत आणि किती लोकांना नुकतेच बाहेर काढण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे घर कोणत्या कारणामुळे कोसळले हे अद्याप कळू शकलेले नाही. या घरात किती लोक पुरले आहेत हे तपासानंतरच स्पष्ट होईल. सध्या प्रशासन पूर्णपणे बचाव कार्य करत आहे.

पोलीस अधिकारी काय म्हणाले: राष्ट्रीय राजधानीतील भजनपुरा भागातील एक इमारत बुधवारी कोसळली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोसळण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये एक भव्य बहुमजली इमारत जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

बुधवारी दुपारी घडली घटना: ट्विटरवर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये लोक घर कोसळल्यानंतर मागे राहिलेल्या ढिगाऱ्याजवळून चालत असल्याचे दाखवले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन विभागाला दुपारी 3:05 वाजता माहिती मिळाली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. बचाव कार्य सुरू असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. इमारत कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणी लोक होते की नाही किंवा कोणत्या कारणामुळे ही इमारत कोसळली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यापूर्वीही झाल्या आहेत घटना: व्हिडिओ पाहता, इमारत जुनी वाटत असली तरी अधिकृतपणे काहीही पुष्टी झालेली नाही. यापूर्वी 1 मार्च रोजी उत्तर दिल्लीच्या रोशनारा रोडवर आग लागल्यानंतर चार मजली इमारत कोसळली होती परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय राजधानीत एका घटनेत, भयावह क्षणाचा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला होता, त्यात चार मजली इमारत कोसळताना शूटिंग करण्यात आले होते. इमारत आधीच रिकामी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा: शार्पशुटर उस्मानचा पोलिसांनी केला एन्काउंटर, पुढे झालं असं काही की वाचून थरकाप उडेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.